वानवडी बलात्कार प्रकरणातील (Wanavadi Rape case) अल्पवयीन पिडीत मुलीवर ससून रुग्णालायात (Sasoon hospital) उपचार सुरु असून तिची प्रकती हळूहळू सुधारत आहे. मात्र या प्रकरणात सुरुवातीला रेल्वे कर्मचाऱ्यांकडून (Railway Employee) बलात्कार झाला ही बाब अत्यंत गंभीर आहे. केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याशी माझे फोनवरुन बोलणे झाले आहे. तसेच, त्या कर्मचाऱ्यांचे केवळ निलंबन पुरेसे नसून त्यांच्यावर अधिक कडक कारवाई करण्याबाबत मी त्यांच्याशी चर्चा केली आहे. अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे (Dr. Nilam Gorhe) यांनी दिली.
हे देखील पहा-
पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पुणे रेल्वे स्टेशनवरील रेल्वे कर्मचार्यांकडून सी सी टी व्ही फुटेजच्या सहायायाने वेळीच पाऊले उचलली गेली असती तर बलात्काराची घटना टळली असती. ज्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली ते दोन कर्मचारी काम करत होते त्यांच्यावरही कारवाई व्हावी. प्रत्येक रेल्वे आणि बस स्थानकावर महिलांसाठी सुरक्षेचे उपाय करावेत,अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीत एका १४ वर्षीय मुलीवर ८ जणांनी बलात्कार केला. गावी जाण्यासाठी पीडित मुलगी ३१ ऑगस्ट रोजी रेल्वे स्टेशनला गेला होती. मात्र, रात्रीच्या वेळी तिला कोणतीही गाडी मिळणार नाही,तू गावी कशी जाणार, आम्ही तुझी राहण्याची व्यवस्था करतो, असे सांगत काही नराधमांनी तिला बाहेर आणले, रिक्षातून तिला वानवडी परिसरात नेत तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला. ६ सप्टेंबर रोजी पोलींसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांना काही तासातच सर्व आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. आरोपींमध्ये ६ रिक्षा चालक आणि २ रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
Edited By- Anuradha
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.