Mumbai News
Mumbai NewsSanjay Gadade Saam TV

Mumbai News: मुंबईतील मालाड परिसरात 'फिर हेराफेरी'; बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

मुंबईच्या बांगुरनगर लिंक रोड पोलिसांनी बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे.
Published on

संजय गडदे

Mumbai News: 'फिर हेराफेरी' हा धमाल कॉमेडी चित्रपट तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल. या चित्रपटात 21 दिनमें पैसा डबल करणारं बोगस कार्यालय दाखवण्यात आलं होतं. असाच काहीसा प्रकार मुंबईच्या मालाड परिसरात उघडकिस आला आहे. मात्र यामध्ये चक्का 24 तासांत पैसे दुप्पट करण्यांच आमिष दाखवण्यात आलं आहे. मुंबईच्या बांगुरनगर लिंक रोड पोलिसांनी या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. (Latest Mumbai News)

मालाड पश्चिमेकडील बोगस कॉल सेंटरमध्ये हा धक्कादायक प्रकार सुरू होता.या कॉल सेंटरमधून नागरिकांना 24 तासात दुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवले जात होते. मात्र या कॉल सेंटरच्या माध्यमातून असे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी बांगुर नगर पोलिसांनी या कॉल सेंटरवर छापा टाकून एका आरोपीला अटक केली आहे.

तसेच त्याच्याकडून संगणक,8 हार्ड ड्राईव्ह, पेन ड्राईव्ह आणि 3 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.राजेश जयेश पिल्ले (28) असं अटक झालेल्या आरोपीचे नाव असून त्याचे दोन साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिमेकडील एव्हरशाईन नगर येथे CIELOX BUSINISS SOLUTIONS LLP या नावाने हे कथित कॉल सेंटर चालवले जात होते या कॉल सेंटरच्या माध्यमातून www.visionfxmakets.com वर नोंदणी केलेल्या भारतीय आणि इतर देशांतील लोकांशी इंटरनेट व्हिप कॉलद्वारे संवाद साधायचे.

तसेच त्यांना 200 डॉलर गुंतवणूक केल्यास 24 तासात परतावा म्हणून 400 डॉलर इतकी रक्कम देण्याचे आमिष दाखवले जात असे. मात्र फिर्यादी यांना परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच बांगुर नगर पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दिली. या तक्रारीनुसार या बोगस कॉल सेंटर विरोधात गुन्हा दाखल केला.

Mumbai News
दुर्दैवी! लिफ्टमध्ये अडकून २६ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू, मालाड मधील शाळेतील प्रकार

या प्रकरणाचा तपास करत असताना, बांगुरनगर पोलिसांनी आदित्य इस्टेट एव्हरशाईन नगर मालाड पश्चिमेकडील CIELOX BUSINISS SOLUTIONS LLP वर छापा टाकला. त्या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या राजेश जयेश पिल्ले याला अटक केली. मात्र त्याचे दोन साथीदार सध्या फरार असून त्यांचा बांगुर नगर पोलीस शोध घेत आहेत.

Mumbai News
Mumbai : घरफोडी करणाऱ्या चोरांचा अखेर पर्दाफाश! ; मालाड पोलिसांकडून कारवाई

या कॉल सेंटरच्या माध्यमातून शंभर पेक्षा अधिक लोकांची फसवणूक झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com