

रुपाली बडवे
मुंबई: लालबागच्या राजाला (Lalbaugcha Raja) भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आणि निधीची आजपासून मोजणी सुरू करण्यात आली आहे. लालबागचा राजा गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) मंडळांने बॅंक ॲाफ महाराष्ट्र आणि महानगर बॅंकचे कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने ही मोजदात सुरू केली आहे. गणेशोत्सवात दरवर्षी लाखोंच्या संख्येने गणेशभक्त लालबागच्या राजाला दान अर्पण करतात, त्या सर्वांची आता मोजदात सुरू करण्यात आली आहे. (Lalbaugcha Raja Latest News)
हे देखील पाहा -
लालबागचा राजा गणपती मुंबईसह महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यामुळे बाप्पाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने येणारे भाविक हे आपल्या परीने पैसे, सोन्या-चांदीच्या वस्तू या दान करतात. लालबागच्या राजाला प्रचंड संख्येने दान येते त्यामुळे याची मोजणी करण्यासाठी मंडळाचे सदस्य हे विशेष काळजी घेतात. मागील गणेशोत्सवात एकूण देणगीची रक्कम ८ कोटींच्या घरात गेली होती. आता २ वर्षानंतर गणेशोत्सव साजरा होत असल्याने यंदा दुप्पटीने देणगी येईल, अशी आशा लालबागचा राजा गणपती मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी व्यक्त केली आहे.
लालबागचा राजा गणपती मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी माहिती दिली की, आजपासून रोज अशा पद्धतींची मोजणी होईल. मागील २४ तासात लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेली निधी आणि सोने-चांदीच्या दागिन्यांची मोजणी सुरू झाली आहे. यात केवळ पैसेच नाही तर अनेक पत्र देखील आलेत. बँकेचे कर्मचारी आणि मंडळाचे सदस्य असे जवळपास ८० जण ही मोजणी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.