अभिजित देशमुख,कल्याण
रेल्वे अपघातात दररोज अनेक व्यक्ती जखमी होतात. तर काहींचा यामध्ये मृत्यू देखील होतो. ट्रेन भरधाव वेगात असताना अनेक जण जागा मिळावी म्हणून धावती ट्रेन पकडतात. तर काही जण ट्रेन सुरू झाली असून देखील उशिर होऊ नये म्हणून धावती ट्रेन पकडतात. तर काही व्यक्ती ट्रेन पूर्ण भरलेली असताना सुद्धा दरवाजाला लटकत प्रवास करतात. त्यामुळे अपघात वाढत आहेत.
आज सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकात सुद्धा अशीच एक घटना घडली आहे. रेल्वे स्थानकात सकाळी गर्दीच्या वेळी एक महिला ट्रेन पकडताना खाली पडली होती. महिला प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रुळांमध्ये अडकून पडली होती. महिलेची अवस्था पाहून मोटारमॅनने देखील ट्रेन थांबवली. तसेच आरपीएफ जवानांच्या मदतीने या महिलेला बाहेर काढण्यात यश आलं आहे.
मानसी किर असं या महिलेचं नाव आहे. महिला प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये अडकली तेव्हा अन्य प्रवाशांनी आरडा ओरड सुरू केला. प्रसंगावधान राखत प्रवाशांनी ट्रेनची चैन देखील खेचली आणि ट्रेन थांबली.
आरपीएफ आणि जीआरपी यांच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्रवाशांच्या मदतीने मानसी किर यांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेत मानसी किर यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली. सुदैवाने, प्रवाशांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली.
अशाच आणखी एका घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती धावती ट्रेन पकताना खाली पडला आहे. खाली पडल्याने हा व्यक्ती देखील रुळांमध्ये अडकतो. मात्र या घटनेत ट्रेनने लगेच वेग पकडल्याने ट्रेन थांबली नाही. पण येथे बाळासाहेब ढगे नावाचे एक ऑफ ड्यूटी पोलीस होते. त्यांनी लगेचच या व्यक्तीला बाहेर खेचले आणि त्याचे प्राण वाचवले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.