Shrikant Shinde Vs BJP: पोलीस अधिकाऱ्यांवरून सेना-भाजपतात जुंपली? 'त्या' अधिकाऱ्याची ईडी चौकशी झालीच पाहिजे, BJP आक्रमक

पोलीस अधिकाऱ्यांवरून सेना-भाजपतात जुंपली? त्या अधिकाऱ्याची ईडी चौकशी झालीच पाहिजे, BJP आक्रमक
Shrikant Shinde Vs BJP:
Shrikant Shinde Vs BJP:Saam Tv
Published On

>> अभिजित देशमुख

Shrikant Shinde Vs BJP: डोंबिवलीतील भाजपा पदाधिकाऱ्यांनी मानपाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी कोट्यवधीची मालमत्ता जमवल्याचा आरोप केलाय. याबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुळे यांनी पोलीस अधिकारी बागडे मालमत्ते संदर्भात ईडी व सीबीआयकडे तक्रार करणार असल्याचे देखील सांगितले.

भाजपचे मंडळ अधिकारी नंदू जोशी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपाने मानपाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या विरोधात आक्रमक पवित्र घेतला. काही दिवसांपूर्वी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपाने जोपर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होत नाही, तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य करणार नाही, असा ठराव देखील पारित केला होता. याच मुद्द्यावरून कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना व भाजपमध्ये तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Shrikant Shinde Vs BJP:
Mumbra Crime News: मोबाईल जिहादचा मास्टर माईंड अखेर गजाआड, ऑनलाईन करायचा तरुणांचं धर्मांतर

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर एका महिलेने शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप केला. त्यानंतर डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात नंदू जोशी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे हे भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करत मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. (Latest Marathi News)

शेखर बागडे यांची बदली करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. त्यानंतर शेखर बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. मात्र बदली न झाल्याने भाजपाने आक्रमक पवित्रा घेत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शेखर बागडे यांची जोपर्यंत बदली होत नाही, तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य करणार नाही, असा ठराव पारित केला.

Shrikant Shinde Vs BJP:
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA मध्ये पुन्हा होणार वाढ? इतक्या रुपयांनी वाढणार पगार

मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्याच कल्याण लोकसभा मतदारसंघात ही घटना घडल्याने शिवसेना व भाजपा मध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी देखील राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. याबाबत देखील भाजप नेत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. त्यातच आता भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शेखर बागडे यांनी बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप केला.

आज डोंबिवली भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधिकारी शेखर बागडे यांनी त्यांच्या व नातेवाईकांच्या नावावर बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करत मालमत्तेचा लेखाजोखा मांडला. शेखर बागडे यांची व त्यांच्या कुटुंबीयांनी जमवलेली कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्ता कुठून आली, कशाप्रकारे आली त्याचे स्रोत काय होते, या गोष्टीची चौकशी व्हावी, अशी मागणी सीबीआय आणि ईडी कडे करणार असल्याचे देखील सांगितले. एकूणच कल्याण लोकसभा मतदारसंघात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या बदलीच्या मुद्द्यावरून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com