Dombivli: नशेत चालवली कार; सात वाहनांना धडक २ रिक्षांचा चक्काचूर

कार चालकाला विष्णुनगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून हा चालक पूर्णपणे नशेत आहे.
Dombivli Accident News
Dombivli Accident NewsSaam News

डोंबिवली : डोंबिवली (Dombivli) पश्चिमेतील उमेश नगर परिसरात काल ४ वाजताच्या सुमारास नशेत असणाऱ्या एका तराट चारचाकी चालकाने उभ्या असलेल्या सहा ते सात गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली आहे.

या धडकेत ५ दुचाकी आणि २ रिक्षाचा (Rickshaw) समावेश असून एका डीपीलाही धडक दिली आहे. कार चालकांचा वेग इतका भीषण होता की उभ्या असलेल्या रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. यातील कार चालकाला विष्णुनगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून हा चालक पूर्णपणे नशेत आहे.

पाहा व्हिडीओ -

डोंबिवली पश्चिमेत तराट कार चालकाने भरधाव वेगात गाडी चालवत उभ्या असलेल्या पाच ते सहा गाड्यांना धडक दिली. यात रिक्षा अक्षरशः चक्काचूर झाली असून सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.

नशेत गाडी चालविणारा वाहन चालक निलकंठ पटवर्धन यांच्या विरोधात विष्णुनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गाड्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून सर्व वाहनचालकांनी विष्णुनगर पोलीस स्थानकात (Vishnunagar Police Statio) धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com