
डोंबिवलीत दिवाळीचा स्टॉल लावण्यावरुन राडा
बचत गटाच्या महिला आणि फेरीवाल्या महिलांमध्ये वाद
फेरीवाल्या महिलेने केला स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही, प्रतिनिधी
Dombivli City News : डोंबिवलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवाळीच्या स्टॉल लावण्यावरुन डोंबिवलीमध्ये महिला बचत गट आणि फेरीवाल्या महिलांमध्ये राडा झाला. वाद वाढल्यानंतर फेरीवाल्या महिलेने पेट्रोल सदृश्य पदार्थ अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेला असलेल्या घनश्याम गुप्ते रोडवर स्टॉल लावण्यावरुन महिला बचल गटाला स्टॉल लावण्यास काही महिला फेरीवाल्यांनी विरोध केला. काल (१३ ऑक्टोबर) महिला बचत गटाच्या महिला या ठिकाणी दिवाळीचा स्टॉल लावण्यासाठी आल्या होत्या, तेव्हा त्यांनी फेरीवाल्या महिलांनी विरोध करून पिटाळून लावले होते.
या घटनेनंतर आज (१४ ऑक्टोबर) महिला गट केडीएमसी महापालिका अधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन पुन्हा आल्या असताना महिला फेरीवाल्यांनी पुन्हा विरोध केला. त्यानंतर दोन्ही महिला गटात मोठा राडा झाला. आम्ही इथे २० वर्षांपासून बसत आहोत, तुम्ही कुठून आलात, असे म्हणत फेरीवाल्या महिलांनी हुज्जत घातली. महापालिकेची परवानगी असतानाही फेरीवाल्या महिलांची मुजोरी पाहायला मिळाली.
दोन महिला गटांमधील वाद इतका विकोपाला गेला की, एका फेरीवाल्या महिलेने स्वतःच्या अंगावर पेट्रोल सदृश्य ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरातील वातावरण आणखी पेटले. याची माहिती मिळताच केडीएमसी आणि विष्णू नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. ज्या महिलेने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता, तिला रुग्णालयात नेण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा परप्रांतीय फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.