Dombivli Building Collapse: डोंबिवलीत तीनमजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती

Dombivli News: डोंबिवलीत तीनमजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती
Dombivli Building Collapse News
Dombivli Building Collapse NewsSaam Tv

>> अभिजित देशमुख

Dombivli Building Collapse News:

डोंबिवलीत मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर येत आहे. येथे तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना डोंबिवलीतील अहिरे रोड परिसरात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदिनारायण कृपा बिल्डिंग आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास अचानक कोसळली. यात एक महिला आणि एक पुरुष असे दोन जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी महापालिका, पोलीस प्रशासन आणि तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत.

Dombivli Building Collapse News
Ganpati Festival: बाप्पा पावला! कोकणात गणपतीला जाणाऱ्यांसाठी टोलमाफी, सरकारचा मोठा निर्णय

या ३ मजली इमारतीमध्ये सुमारे 40 कुटुंब राहत होते. मात्र महापालिकेकडून त्या इमारतीला धोकादायक म्हणून जाहीर करून त्यातील कुटुंबांना बाहेर काढण्याची नोटीस बजावली होती. (Latest Marathi News)

तरी देखील त्या इमारतीमध्ये चार ते पाच कुटुंब राहत होते. तसेच आज सकाळी इमारतीची माती पडत असल्याने महापालिकेने राहत असलेल्यानागरिकांनी घर खाली करण्याच्या सूचना केल्या तरी देखील दोन कुटुंब राहत होते.

Dombivli Building Collapse News
New Smartphone: 108MP कॅमेरा, पॉवरफुल फ्लॅश लाईट; BMW टच; किती आहे Infinix च्या या नवीन फोनची किंमत...

तेव्हा सायंकाळी साडेचार च्या सुमारास सदर इमारत अचानक कोसळली त्यात अरविंद भाटकर (७०) आणि गीता लोढाया (४५) असे दोघे जण अडकले असून त्यांच्या शोध कार्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com