Dombivli: '२० हजार द्या, अन्यथा...; तरूणाची बार मालकाशी हुज्जत अन् पोलिसांना शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल

Dombivli Bar Threat Case: डोंबिवलीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीचा बार चालकाला धमकावतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Dombivali Crime
Dombivali CrimeSaam
Published On

डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीचा बार चालकाशी हुज्जत घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती बार चालकाकडे दरमहा २० हजार रूपयांची मागणी करताना दिसत आहे. तसेच पोलिसांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Dombivali Crime
Beed Crime: 'ये पाया पड नाहीतर..' मुंडे टोळीने तरूणाला बेल्टनं झोडलं, नंतर नाक घासून पाया पडायला लावलं

डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारमध्ये हा प्रकार घडला. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बार मालकाशी हुज्जत घालताना दिसत आहे. तसेच त्याच्याकडे २० हजार रूपयांची मागणी करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती 'पोलिसांकडे जाऊ नका, ते तुमच्याकडून जास्त पैसे घेतील आणि मला कमी देतील', असं म्हणत बार मालकाला धमकावताना दिसत आहे.

Dombivali Crime
Nashik: अवकाळीचा कहर जीवाशी! नाशिकमधील दोघांचा पावसामुळे मृत्यू, एकाचा विजेमुळे तर..

बार चालकाला धमकावल्यानंतर तो पोलिसांनाही अश्लील शिवीगाळ करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे. या प्रकारामुळे संबंधित बार चालक पूर्णपणे त्रस्त झाला. त्याने थेट तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. तसेच शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. तसेच कडक कारवाई करण्याचीही मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com