डोंबिवलीसह दिवा रेल्वे स्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा; भाजप, मनसेचा आंदोलनाचा इशारा

Dombivali And Latest News: मनसेने पत्रकार परिषद घेत स्टेशन परिसरात फेरीवाले हटवा अन्यथा मनसे मैदानात उतरेल असा इशारा मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी दिला आहे.
Dombivli and Diva railway station covered by peddler ; BJP and MNS warning of agitation
Dombivli and Diva railway station covered by peddler ; BJP and MNS warning of agitationप्रदीप भणगे
Published On

डोंबिवली: डोंबिवली आणि दिवा स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाले दिसतात आणि याचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे आणि वाढत्या फेरीवाल्यांमुळे डोंबिवलीत मनसेने (MNS) आवाज उठवला आहे, तर दुसरीकडे दिव्यात भाजपने (BJP) आवाज उठवला आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात खुलेआमपणे फेरीवाल्यांनी व्यवसाय थाटले असून याचा प्रवासी आणि नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. (Dombivli and Diva railway station covered by peddler ; BJP and MNS warning of agitation)

हे देखील पहा -

स्टेशन परिसरापासून १५० मिटीर परिसर फेरीवाल्यांपासून मोकळा करा,असा आदेश न्यायालयाने दिला असला तरी डोंबिवलीत (Dombivali) पाळला जात नाहीये. स्टेशन परिसरातील फेरीव्याल्यांवर कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून (KDMC) करावाई केली जाते. मात्र ती कारवाई दिखावा असते असे अनेक वेळेला सिद्ध झाले आहे. कारवाई केल्यानंतर काही वेळाने फेरीवाले पुन्हा येऊन बसतात हे चित्र नेहमीच झाले आहे. मात्र यावर कोणती ठोस कारवाई केली जात नाही.

गेले 25 वर्षे येथे सेनेची सत्ता आहे. त्यांना अद्याप फेरीवाल्यांचे नियोजन करता आलेले नाही. केवळ हप्ते घेण्याचे काम ते करतात असा आरोप करत मनसेने पत्रकार परिषद घेत स्टेशन परिसरात फेरीवाले हटवा अन्यथा मनसे  मैदानात उतरेल असा इशारा  मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी दिला आहे.

तर दुसरीकडे ठाणे महापालिका हद्दीत दिवा शहरात सुद्धा फेरीवाले त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. दिवा स्टेशन परिसर आणि दिवा शहरातील सर्व रस्ते हे फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीस अडचण निर्माण करणारे झाले आहेत. दिवा शहरातील प्रमुख रस्ते फेरीवाला मुक्त करा आणि शहरातील लाखो नागरिकांना दिलासा द्या, अन्यथा प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात जन आंदोलन करू, असा इशारा भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी दिला आहे.

Dombivli and Diva railway station covered by peddler ; BJP and MNS warning of agitation
ST Bus Strike: पवारांच्या भेटीसाठी आदित्य ठाकरे सिल्वर ओकवर

फेरीवाले हटवा अन्यथा आंदोलन करू असा इशारा डोंबिवलीत मनसेने दिला आहे आणि दिव्यात भाजपने इशारा दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि पालिका याकडे गांभीर्याने लक्ष देणार का हे पाहवे लागेल.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com