कल्याणमधील अतिवृष्टीबाधितांना मदतीचे वाटप सुरू, कल्याणच्या तहसीलदारांची माहिती

आतापर्यंत ५ हजार ५०० बाधितांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात आले असून, दिवाळीपर्यंत उर्वरित ९ हजार ५०० बाधितांना प्रत्येकी दहा हजार वाटप करण्यात येणार आहे.
कल्याणमधील अतिवृष्टीबाधितांना मदतीचे वाटप सुरू, कल्याणच्या तहसीलदारांची माहिती
कल्याणमधील अतिवृष्टीबाधितांना मदतीचे वाटप सुरू, कल्याणच्या तहसीलदारांची माहितीप्रदीप भणगे
Published On

कल्याण: जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण तालुक्यात अनेकांचे नुकसान झाले होते. यातील बाधित कुटुंबाना राज्य सरकारकडून जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेल्या अनुदानापैकी १६ कोटी ३६ लाख रुपयांचे अनुदान कल्याण तालुक्याला मिळाले असल्याची माहिती कल्याणचे नवनियुक्त तहसीलदार विजय पाटील यांनी दिली आहे. (Distribution of aid to flood victims in Kalyan begins, information by tehsildar of Kalyan)

हे देखील पहा -

तसेच शासनाकडून मिळालेल्या अनुदानाचे वाटपसुद्धा करायला सुरुवात केली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. ज्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले होते. त्यातील तहसील कार्यालयाने जवळपास १६ हजार बाधित कुटुंबाचे पंचनामे करून, मदतीसाठी अनुदानाची मागणी करणारा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील नुकसानचा एकत्रित पंचनाम्यांचा अहवाल सरकारकडे पाठविला होता. सरकारने बाधितांना दिलेल्या रकमेपैकी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कल्याण तालुक्यातील बाधित कुटुंबीयांना १६ कोटी ३६ लाख रुपयांची रक्कम मिळाली आहे. बाधित झालेल्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दिले जाणार आहे.

कल्याणमधील अतिवृष्टीबाधितांना मदतीचे वाटप सुरू, कल्याणच्या तहसीलदारांची माहिती
चंद्रकांत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद गेल्यानंतर त्यांना कुणीही विचारणार नाही - आमदार सुनील शेळके

आतापर्यंत ५ हजार ५०० बाधितांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात आले आहेत, तर दिवाळीपर्यंत उर्वरित ९ हजार ५०० बाधितांना प्रत्येकी दहा हजार वाटप करण्यात येणार असून कल्याण तहसीलमधील सहा नोडल येथे याचे काम चालू आहे अशी माहिती कल्याणचे नवनियुक्त तहसीलदार विजय पाटील यांनी माहिती दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com