पुणे: चंद्रकांत दादा पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद गेल्यानंतर त्यांना कोणीही विचारणार नाही असा खोचक टोला मावळ विधानसभेचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार सुनिल शेळके यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना लगावला आहे. (No one will ask Chandrakant Patil after his resignation - MLA Sunil Shelke)
हे देखील पहा -
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याने आमदार सुनिल शेळकेंनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे. शेळके म्हणाले की, ''चंद्रकांत दादा पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद गेल्यानंतर त्यांना कोणीही विचारणार नाही. काम करताना आपण व्यवस्थित काम करायला पाहिजे पवार साहेबांवर ती टीका करून आपण मोठे होत नाही. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, आणि बी टीमचे अध्यक्ष किरीट सोमय्या हे वैफल्य ग्रस्त झाले आहेत. काय बोलावे हे त्यांना कळत नाही. राजकारणामध्ये लोकप्रतिनिधींनी किती तारतम्य ठेवावं आणि युवकांनी त्यांच्याकडून काय आदर्श घ्यावा असा प्रश्न आहे. टीका करण्यापेक्षा कामातून उत्तर देऊ असा अजेंडा राष्ट्रवादीचा आहे, असं ते एका पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
आमदार शेळके पुढे म्हणाले की, चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर मंडळी जे टीका करत आहे. त्यांना पदावरून उतरवलं जाईल तेव्हा शेजारून जाणारा माणूस देखील विचारणार नाही ही परिस्थिती निर्माण होईल अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.