BJP Vs Shivsena
BJP Vs ShivsenaSaam TV

खडाजंगी! भाजपचा माजी नगरसेवक बोलत असताना शिवसेनेच्या नगरसेवकाने ओढला माईक

मनपा शाळेच्या उदघाटन प्रसंगी शिवसेना व भाजप नगरसेवकांमध्ये खडाजंगी.
Published on

सिद्धेश म्हात्रे -

नवी मुंबई : नवी मुंबई (Navi Mumbai) महानगर पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना व भाजपाच्या माजी नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाल्याचं आज पहायला मिळालं. तुर्भे (Turbhe) येथील महानगर पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे उद्घाटनाची आज पार पडले.

यावेळी उद्घाटनाची जय्यत तयारी शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी केली होती. मात्र, कार्यक्रमाच्या ठिकाणी व्यासपीठावर बसू दिलं नाही. तसंच कार्यक्रमात बोलण्याची संधी न दिल्याने भाजपाचे (BJP) माजी नगरसेवक राजू शिंदे यांनी आपला रोष व्यक्त केला.

हे देखील पाहा -

भाजपाचे नगरसेवक बोलायला उभे राहताच, माईक बंद करत शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने माईक खेचून घेतल्याची घटना या कार्यक्रमा दरम्यान घडली. या घटनेमुळे काहीकाळ उद्घाटन कार्यक्रमात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तर कोणताही पाठपुरावा केला नसताना श्रेय घेण्यासाठी भाजपाने उदघाटन कार्यक्रमात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला असून आयत्या बिळावर नागोबा असल्याची टीका शिवसेनेचे (Shivsena) माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com