मुंबई - अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक आणि बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 'डिनर प्लॅन'च्या चर्चेला उधाण आले आहे.बुधवारी ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे. यानिमित्त वानखेडे स्टेडियमवर आज, बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र येत आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच हे सर्वजण एका व्यासपीठावर येत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर हे तिघंही स्नेहभोजनासाठी एकत्र येणार आहेत. एमसीएसाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांनी संयुक्त पॅनेल उभं केले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर तसेच अमोल काळे व अजिंक्य नाईक यांचा समावेश आहे.
दरम्यान, अध्यक्षपदासाठी फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे रिंगणात उतरले आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट ग्रुपकडून अध्यक्षपदासाठी उभे राहिलेले माजी क्रिकेटर संदीप पाटलांसमोर पवार-शेलार महाआघाडीचे आव्हान असणार आहे. ही निवडणूक उद्या होत असून त्याआधी आज रात्री वानखेडे स्टेडिअमवर डिनर डिप्लोमसीचे आयोजन करण्यात आले आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.