संजय गडदे,मुंबई
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न जटील बनत चालला आहे. मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांना रस्त्यावर वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांना दररोज लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबईतील याच रेल्वे आणि रस्ते वाहतूक कोंडीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं आहे. मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची कोंडी कशी फोडता येईल, याचा प्लान देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आहे. (Latest Marathi News)
मुंबईच्या दहीसरमधील एका भूमीपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी मुंबईच्या भविष्यातील विकासकामांची माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'दहीसरच्या एअरपोर्ट ऑथोरिटीच्या जागेवरील राहणाऱ्यांमुळे पुनर्विकासाची कामे थांबले आहेत, मात्र त्यांना पर्यायी जागा देऊन लवकरच त्यांचेही काम केले जाणार आहे. गृहनिर्माण परिषदेत सोळा घोषणा केल्या. त्या 16 घोषणांचे आणि जीआर काढले आहेत. सर्व अडथळे दूर केले आहेत. याचे सेवाशुल्क देखील रद्द केले आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'सामान्य माणसाचे विकासाकरता मोठ्या प्रमाणात काम सुरू केले. आपल्या सरकारने 500 चौरस फुटापर्यंत त्याचा असेसमेंट टॅक्स देखील रद्द केला आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
लोकल ट्रेनवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, '400 किलोमीटरची लोकल ट्रेन हीच आपली जीवनदायी होती. मात्र चार वर्षात 375 किलोमीटर लांबीच्या मेट्रोचे काम हाती घेतले आहे. यावर्षी शंभर किलोमीटरची डिलिव्हरी करू. त्याच्या पुढच्या वर्षी अजून शंभर किलोमीटरची डिलिव्हरी करू. जेवढे प्रवासी लोकलमध्ये फिरतात, तेवढेच प्रवासी मेट्रोमधून प्रवास करतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल सेतूचे उद्घाटन केले, 22 किलोमीटरचा समुद्र सेतू देशातील सर्वात मोठा समुद्र सेतू केवळ पाच वर्षात बांधून दाखवला. आता कोस्टल रोड वांद्रे ते वर्सोवा त्यानंतर पुढे वर्सोवा ते विरार असा मार्ग तयार करत आहोत. पश्चिम द्रुपती मार्गावर सात टक्के ट्रॅफिक असते. या ट्राफिकपासून सुटका मिळेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.