Devendra Fadanvis News: शिवसेना कुणाची शिंदेंनी दाखवलं, तर शिमग्यावर बोलत नाही, फडणवीसांना उद्धव ठाकरेंना टोला

एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांची गर्दी होती, बीकेसीतलं मैदान तुडूंब भरलं होतं.
Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray
Devendra Fadnavis Slams Uddhav ThackeraySaam TV
Published On

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख यांच्या दसरा मेळाव्यातील (Dasara Melava) भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं भाषण ऐकलं. तसेच शिमग्यावर प्रतिक्रिया देत नाहीत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray
Shivsena Dasara Melava: कुणाच्या मेळाव्याला किती गर्दी? मुंबई पोलिसांच्या आकडेवारीने नवा वाद

शिवाजी पार्कपेक्षा बीकेसीतील मैदान बरंच मोठं आहे. एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांची गर्दी होती, बीकेसीतलं मैदान तुडूंब भरलं होतं. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दाखवून दिलं आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. (Maharashtra News)

Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray
Shivsena Dasara Melava: राणा दाम्पत्याचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; हिंदुत्वाचा देखावा, संतुलन बिघडल्याची बोचरी टीका

एकनाथ शिंदे यांना भाजपने स्क्रिप्ट दिली होती, असा टीका विरोधक करत होते. या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, असं जे म्हणत आहेत त्यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे. तेच तेच ऐकून कंटाळा आला आहे. रायटरला क्रिएटिव्हीटी आणायला सांगा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आगामी निवडणुकांमध्ये विधानसभेवर भगवा फडकणारच. मात्र तो भगवा एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आणि भाजप युतीचा असेल, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदनही केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात विकासाच्या मुद्यावर भर दिला. आम्ही काय केले आहे, भविष्यात काय करणार आहोत, याबाबत याची माहिती त्यांनी जनतेला दिली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील पक्षप्रमुखांचे भाषण करत होते, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com