Eknath Shinde : 'देवा लवकर आटप रे हे सगळं, हॉटेलचं बिल वाढतंय'

शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केलेलं ट्विट चर्चेचा विषय बनतं आहे.
Eknath Shinde Deepali Sayyad
Eknath Shinde Deepali SayyadSaam TV

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहे. ठिकठिकाणी शिंदे यांच्याविरोधात शिवसैनिक (ShivSena) आक्रमक झाले आहे. दुसरीकडे ठाण्यात श्रीकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शक्तीप्रदर्शन केलं आहे. अशातच शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी केलेलं ट्विट चर्चेचा विषय बनतं आहे. देवा लवकर आटप रे हे सगळं, हॅाटेल चे बिल वाढतोय, विरोधकांचा भाव वाढतोय, असं दीपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Eknath Shinde Latest News)

Eknath Shinde Deepali Sayyad
'मी एकनाथ शिंदे साहेबांचा पठ्ठा; बॅनर फाडणाऱ्यांना सोडणार नाही'

शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन करूनही शिंदे गटाने आपलं बंड सुरूच ठेवलं आहे. त्यातच आता हे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेनं शिंदे यांच्यासह तब्बल १६ आमदारांना नोटीस बजावली आहे. शिंदे आणि शिवसेनेचे इतर बंडखोर आमदार हे गुवाहाटी येथील हॉटेलमध्येच तळ ठोकून आहेत.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट केलं आहे. "देवा लवकर आटप रे हे सगळं, हॅाटेल चे बिल वाढतोय, विरोधकांचा भाव वाढतोय, ED ची नोटीस लाव वाढतोय, शिवसैनिकांच्या मनातील घाव वाढतोय, आमदारांचा ताव वाढतोय, विधिमंडळातील डाव वाढतोय, लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेला चांगले दिवस दाखव रे महाराजा! होय महाराजा!" असं ट्विट दीपाली सय्यद यांनी केलं आहे. (Deepali Sayyad Latest News)

दीपाली सय्यद दिपाली या आपली भूमिका ठामपणे मांडताना दिसतात. याआधीही त्यांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर भाष्य करणारं ट्विट केलं होतं.“सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरेसाहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू”, असं ट्विट दीपाली सय्यद यांनी केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com