भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या दीपा चौहान राष्ट्रवादीच्या वाटेवर (पाहा Video)

महिला आयोगाने जी मदत केलेय त्यासाठी मी पक्ष जॉईन करणार असून या संदर्भात आपण राष्ट्रवादीला पत्र दिलं आहे.
Ganesh Naik
Ganesh NaikSaam TV
Published On

सिद्धेश म्हात्रे -

नवी मुंबई : भाजपा आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर बलात्काराचा व धमकी देने यांसारखे गंभीर आरोप करणाऱ्या दीपा चौहान आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वाटेवर आहेत. दीपा चौहान यांनी नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष प्राजक्ता मोंडकर यांना पत्र लिहून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्यास इच्छुक असून काम करण्याची संधी मिळावी अशी विनंती केली होती.

आज महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांची देखील दीपा चौहान यांनी भेट घेतली असून मला पूर्वीपासूस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आवडत असून मला समाजकारणाची आवड असल्याची प्रतिक्रिया दीपा चौहान यांनी व्यक्त केलेय. तसंच आपणाला मागील प्रकरणामध्ये महिला आयोगाने जी मदत केली आहे त्यासाठी मी पक्ष जॉईन करणार असून या संदर्भात आपण राष्ट्रवादीला पत्र दिलं असून आपण त्यांच्या उत्तराची वाट पाहात असल्याचं त्या म्हणाल्या.

काय होते आरोप -

ऐरोलीचे आमदार भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान यांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. याबाबत चौहान यांनी राज्य महिला आयोगाची मदत घेतली होती. दरम्यान महिला आयोगाच्या आदेशांमुळे गणेश नाईक यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे गणेश नाईक यांच्या अडचणी वाढ झाली होती. तसंच चौहान माझ्यासह माझ्या मुलाचे अपहरण होण्याची शक्यता असल्यामुळे नाईक यांना जामीन मंजूर करु नये असं त्यांनी एका व्हिडीओद्वारे सांगितलं होतं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com