डोळ्यात मिरची पूड टाकून भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद...

हल्ल्यामागील नेमके काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Dombivli News
Dombivli Newsप्रदीप भणगे
Published On

डोंबिवली - भाजपच्या (BJP) एका कार्यकर्त्यावर दुकानात काम करत असताना अज्ञात इसमांनी अचानक डोळ्यात मिरचीची पूड टाकून वार केल्याची घटना सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाली असून त्याच्यावर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहेत. तर सदर घटनेची माहिती मिळताच आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रुग्णालयात जमा झाले होते.

हे देखील पहा -

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज कटके असे हल्ल्यात जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याच्यावर कोणी हल्ला केला आणि हल्ल्यामागील नेमके काय कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर घटनेची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले. भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याची वार्ता समजताच रुग्णालयात भाजप कार्यकर्त्यानी गर्दी केली होती.आमदार चव्हाण यांनी कटके यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडे माहिती घेतली. कटके यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

Dombivli News
मराठा संघटना आक्रमक; नांदेड - हैदराबाद महामार्गावर टायर जाळून सरकारचा निषेध

याबाबत आमदार चव्हाण म्हणाले, भाजप कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. पोलिसांनी लवकरात लवकर हल्लेखोरांना अटक करावी अशी मागणी भाजपची आहे. तर कल्याण पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांना विचारले असता हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com