Pune Rural SP : पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती

Sandeep Singh Gill News : IPS अधिकारी संदीपसिंग गिल, हे पुणे शहर झोन 1 चे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. आता त्यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेसाठी उपयोग होणार आहे.
Sandeep Singh Gill, Pune Rural SP
Sandeep Singh Gill, Pune Rural SPSaam TV News
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Sandeep Singh Gill Appointed as SP of Pune Rural : पुणे शहरातील परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणारे संदीपसिंग गिल यांची पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने याबाबत आदेश जारी केले आहेत. गिल यांच्या शहरातील यशस्वी कामगिरीची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे.

संदीपसिंग गिल यांनी पुणे शहरात पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना कायदा-सुव्यवस्था राखण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणांदरम्यान गिल यांनी गणेश मंडळांशी समन्वय साधत शांतता आणि सुव्यवस्था कायम राखली. त्यांच्या नियोजनबद्ध कामामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला. याशिवाय, शहराच्या मध्यवर्ती भागात वाढणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी कठोर पावले उचलत गुन्हेगारांवर अंकुश ठेवला. अल्पवयीन गुन्हेगारांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवले. त्यामुळे अनेकांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली.

Sandeep Singh Gill, Pune Rural SP
Pune ISIS Case: पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात २ दहशतवाद्यांना अटक; NIA ची मोठी कारवाई

गिल यांची पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदासाठी सप्टेंबर २०२४ मध्ये शिफारस झाली होती. मात्र, तत्कालीन पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मुदतपूर्व बदलीमुळे त्यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात (कॅट) याचिका दाखल केली होती. न्यायाधिकरणाने देशमुख यांच्या बदलीला स्थगिती दिली होती. दरम्यान, देशमुख यांची पुणे शहरात अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाल्यानंतर गिल यांची नियुक्ती निश्चित झाली. पुणे ग्रामीण भागात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि ग्रामीण पोलिस दलाचे मनोबल उंचावणे हे गिल यांच्यासमोरील प्रमुख आव्हान असेल. त्यांच्या अनुभव आणि कार्यकुशलतेमुळे पुणे ग्रामीण पोलिस दलाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Sandeep Singh Gill, Pune Rural SP
Pune News: राज्यात एकाच दिवशी ३ तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू, खेड, पिंपरी-चिंचवड अन् मावळमध्ये हळहळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com