Mumbai Metro Politics: मेट्रो लोकार्पण सोहळ्यावर दरेकरांचा बहिष्कार; फडणवीसांना निमंत्रण नसल्यानं नाराज

Mumbai Metro Dedication Ceremony Latest News: मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण होतं, मात्र फडणवीसांना निमंत्रण नसल्याचा निषेध म्हणून दरेकरांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत राज्य सरकारचा निषेध केला आहे.
Darekar boycotts Metro inauguration ceremony; darekar is Annoyed that Fadnavis was not invited
Darekar boycotts Metro inauguration ceremony; darekar is Annoyed that Fadnavis was not invitedSaam Tv
Published On

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: राज्यभरात आज गुढीपाडव्याच्या (Gudhipadva) निमित्त हिंदु नववर्षाला सुरुवात झाली आहे. आज पाडव्याच्याच मुहुर्तावर मुंबई मेट्रोचा (Mumbai Metro) लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. मात्र या लोकार्पण सोहळ्यात (Inauguration Ceremony) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना निमंत्रण (Invitation) नसल्यानं भाजप नाराज आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांना मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण होतं, मात्र फडणवीसांना निमंत्रण नसल्याचा निषेध म्हणून दरेकरांनी या कार्यक्रमावर बहिष्कार (Boycott) टाकत राज्य सरकारचा निषेध केला आहे. (Darekar boycotts Metro inauguration ceremony; darekar is Annoyed that Fadnavis was not invited)

हे देखील पहा -

दरेकरांनी मुंबईकरांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईकराना गोरेगाव ते दहिसर मेट्रोचा लाभ मिळणार आहे. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपार कष्ट केले. माझी आज या उदघाटन सोहळ्याला जाण्याची इच्छा होती, मात्र जाणीवपूर्वक आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना डावलण्यात आले, साधे पत्रिकेवर नाव देखील टाकले नाही, याचमुळे मी आज या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे असं दरेकर म्हणाले. आज दुपारी चार वाजता गोरेगाव येथे हा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे.

काल (१ एप्रिल) भाजपच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे शहरात जोरदार बॅनरबाजी करत मेट्रोचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत शिवसेनेला डिवचले होते. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे फोटो असून 'काम केलंय मुंबईने पाहिलंय' असं लिहिण्यात आलं. तसेच मेट्रो प्रकल्पाच्या (Mumbai Metro) ३३७ कि.मी. १,४०,४३३ कोटी रुपये असा आशय लिहीत देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना काय प्रत्युत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, अखेर सेनेने फडणवीसांना थेट निमंत्रण पत्रिकेतूनच वगळल्याने शिवसेनेने चांगलीच खेळी खेळली आहे. आता या कार्यक्रमाला विधान प्रविण दरेकरही हजर राहणार नाहीत.

मार्गः २ ए (Metro 2A Line)

स्थानके: दहिसर पूर्व, अप्पर दहिसर स्टेशन (आनंद नगर), कंदरपाडा (रुषी संकुल), मंडपेश्वर (आयसी कॉलनी), एकसर, बोरिवली पश्चिम (डॉन बॉस्को), पहारी एकसर (शिंपोली, नंतर शिंपावली), कांदिवली पश्चिम (महावीर नगर), डहाणूकरवाडी (कामराज नगर), वलनई (चारकोप), मालाड पश्चिम, लोअर मालाड (कस्तुरी पार्क), पहारी गोरेगाव (बांगूर नगर), गोरेगाव पश्चिम, ओशिवरा (आदर्श नगर), लोअर ओशिवरा (शास्त्री नगर ) आणि अंधेरी पश्चिम (डीएन) नगर ).

मार्ग: मेट्रो ७ (Metro 7 Line)

स्थानके: दहिसर पूर्व, ओवारीपारा, राष्ट्रीय उद्यान, देवीपारा, मागाठाणे, पोईसर (पूर्वीचे महिंद्रा अँड महिंद्रा), आकुर्ली (पूर्वीचे बांडोंगरी), कुरार (पूर्वीचे पुष्पा पार्क), दिंडोशी (पूर्वीचे पठाणवाडी), आरे, गोरेगाव ई (पूर्वीचे महानंद), जोगेश्वरी ई (पूर्वीचे जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (पूर्वीचे अंधेरी पूर्व).

Darekar boycotts Metro inauguration ceremony; darekar is Annoyed that Fadnavis was not invited
Ajit Pawar: हे जीएसटी भवन मुंबईकरांची नवी ओळख होईल - अजित पवार

मेट्रो भाडे (Mumbai Metro Fare 2022):

• ०-३ किमी: १० रुपये

• ३-१२ किमी: २० रुपये

• १२-१८ किमी: ३० रुपये

• १८-२४ किमी: ४० रुपये

• २४-३० किमी: ५० रुपये

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com