Dagdusheth Ganpati: वृंदावनचे वैभव पुण्यात! 'दगडूशेठ' गणपतीसाठी साकारणार प्रेम मंदिराची 100 फूट उंच भव्य प्रतिकृती

Dagdusheth Ganpati: गणेशोत्सव 2026 निमित्त पुण्यात वृंदावनच्या प्रसिद्ध प्रेम मंदिराची 100 फूट उंच भव्य प्रतिकृती उभारली जाणार आहे. कृष्णलीला, आकर्षक रोषणाई आणि संगमरवरी वास्तुकलेचे दर्शन भाविकांना घडणार आहे.
Dagdusheth Ganpati
Dagdusheth GanpatiSaam Tv
Published On

Dagdusheth Ganpati: गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरिता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. यंदा ज्या प्रेम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे, ते मनमोहक पांढऱ्या संगमरवरी वास्तुकलेसाठी व उत्कृष्ट कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय भव्य स्तंभ, प्रकाशमान घुमट आणि कृष्णलीलांचे दर्शन यांसाठी सुपरिचित असलेल्या या मंदिराची प्रतिकृती यंदा गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. नानाविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी असेल. जिथे भक्ती प्रेम बनते आणि प्रेम देवत्व बनते या संकल्पनेवर आधारित ही भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

प्रतिकृतीच्या रचनेत संगमरवरी वास्तुकलेपासून प्रेरित भव्य दर्शन भाग असणार आहे. उत्तर भारतीय मंदिराच्या पारंपरिक रचनेचे प्रतिबिंब दर्शवणारी कलाकुसर केलेले स्तंभ आणि घुमट, रासलीला, गोवर्धन लीला, झुला यांसारख्या कृष्णलीला दर्शविणारे शिल्पपट देखील असणार आहेत. शोभिवंत फुलांची सजावट, पवित्र शुभचिन्हे आणि आकर्षक विद्युतरोषणाईमुळे सायंकाळनंतर हे मंदिर उजळून निघणार आहे.

Dagdusheth Ganpati
Actor Death: मराठी नाट्यविश्वातील ज्येष्ठ अभिनेते- गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरता श्वास

प्रारंभी बुधवार चौकामध्ये भव्य कमान साकारण्यात येणार असून त्यावर आकर्षक नक्षीकाम पहायला मिळेल. मुख्य प्रतिकृतीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रनिंग मांडवावर कृष्णलीलेतील विविध प्रसंग साकारण्यात येणार आहेत. मंदिराच्या वर दर्शनी भागात राधा-कृष्णाची भव्य मूर्ती देखील असणार आहे. अशा वृंदावनामधील विलोभनीय प्रेम मंदिराची प्रतिकृती गणेशोत्सव २०२६ मध्ये देश-विदेशातील गणेशभक्तांना पुण्यात पाहायला मिळणार आहे. देखाव्यामुळे देशातील धार्मिक, सांस्कृतिक वैभवाचे दर्शन येथे घडते, त्यातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढण्यास मदत होते.

Dagdusheth Ganpati
Rakhi Sawant: 'काय हा प्रकार...'; राखी सावंतचा नवा रेड ड्रेस लूक पाहून नेटकरी हैरान, VIDEO व्हायरल

प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. यामध्ये अनेक भव्य खांब असून विविध मूर्ती देखील असणार आहेत. गाभारा व मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक नितेश कुमार आणि ग्लिटरी इव्हेंट्स प्रा. लि. यांनी मंदिराच्या प्रतिकृतीचे काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com