Dadar Kabutarkhana Rada: जैन समाजाला हिंसक बनवण्याचे काम मोदी-शहांनी केलं, संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut Criticized PM Modi And Amit Shah: मुंबईतील कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी थेट पीएम मोदी आणि अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 'जैन समाजाला हिंसक बनवण्याचे काम मोदी-शहांनी केलं.', असे मत त्यांनी व्यक्त केले.
Dadar Kabutarkhana Rada: जैन समाजाला हिंसक बनवण्याचे काम मोदी-शहांनी केलं, संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut Criticized PM Modi And Amit ShahSaam Tv
Published On

Summary -

  • दादर कबुतरखाना बंद करण्यावरून जैन समाज आक्रमक

  • संजय राऊतांचा मोदी-शहा यांच्यावर गंभीर आरोप

  • बीएमसीकडून कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर दंडाची कारवाई

  • कोर्टाच्या आदेशानुसार कबुतरखान्यांवर बंदी लागू

मुंबईत कबुतरखान्याचा वाद चांगलाच पेटला आहे. दादर येथील कबुतरखाना बंद करण्याच्या कारणावरून जैन समाज आक्रमक झाला आहे. त्यांनी दादरमध्ये आंदोलन करत कबुतरखान्यावर बीएमसीने टाकलेली ताडपत्री आणि बांबू हटवले होते. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापटी झाली होती. कबुतरखाना परिसरामध्ये दाणे टाकू नका असे सांगून देखील जैन समाजाच्या नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. याच मुद्द्यावरून संजय राऊत संतप्त झाले असून त्यांनी थेट पीएम मोदी आणि अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 'जैन समाजाला हिंसक बनवण्याचे काम मोदी-शहांनी केलं.', असे संजय राऊत म्हणाले.

Dadar Kabutarkhana Rada: जैन समाजाला हिंसक बनवण्याचे काम मोदी-शहांनी केलं, संजय राऊतांचा घणाघात
Mumbai : कोर्टाचा आदेश धाब्यावर बसवला अन् कारच्या टपावर कबुतरांसाठी खाद्य ठेवलं, पोलिसांनी घडवली अद्दल

संजय राऊत यांनी सांगितले की, 'जैन समाज हा परंपरेने अहिंसक मानला जातो. त्याच्या हातात चाकू आणि शस्त्र असले आणि ते जर अशाप्रकारे हिंसक आणि आक्रमक होतात तर त्यांनी त्यांच्या धर्माचा भगवान महावीरसाहेबांचा जो विचार आहे तो ते पाळत नाहीत. याचं कारण या समाजाला अहिंसक बनवण्याचा काम भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी, अमित शहा करत आहेत. त्याच्यामुळे हा समाज आपल्या विचारापासून आपल्या धर्माच्या विचारापासून दूर जाताना मला दिसत आहे.'

Dadar Kabutarkhana Rada: जैन समाजाला हिंसक बनवण्याचे काम मोदी-शहांनी केलं, संजय राऊतांचा घणाघात
Dadar kabutar khana : कबूतरप्रेमींना दणका! कबूतरांना अन्नपाणी देण्याची बंदी कायम, कोर्टाने काय म्हटलं?

मुंबईतील अनेक ठिकाणी असणाऱ्या कबुतरखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कबुतरखाण्यांवर बंदी घालण्याचे आदेश कोर्टाने बीएमसीला दिले. कोर्टाच्या आदेशानंतर बीएमसीने या कबुतरखान्यांवर ताडपत्री टाकून ते झाकले. पण तरी देखील जैन समाजातील नागरिक त्याठिकाणी जाऊन कबुतरांना खाद्य टाकत आहेत. या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. आता कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या नागरिकांकडून ५०० रुपयांचा दंड आकारला जात आहे. त्यासाठी पालिकेकडून कर्मचारी देखील तैनात करण्या आले आहेत. ३ ऑगस्टपासून ते आतापर्यंत ८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचा माहिती पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

Dadar Kabutarkhana Rada: जैन समाजाला हिंसक बनवण्याचे काम मोदी-शहांनी केलं, संजय राऊतांचा घणाघात
Dadar Kabutar Khana : कोर्टाचे आदेश पायदळी, कारच्या छतावर कबूतरांसाठी खाद्य ठेवलं; काही तासांत पोलिसांनी माज उतरवला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com