Cylinder Blast: सायन कोळीवाडा परिसरात घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी

Cylinder Explosion In Sion Koliwada Area: मुंबईमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर स्फोट झाला. ही घटना सायन कोळीवाडा परिसरात घडली आहे.
Cylinder Blast
Cylinder BlastCylinder Blast Mumbai
Published On

सुरज मसुरकर, साम टिव्ही मुंबई

मुंबईमध्ये सायन कोळीवाडा परिसरात सिलिंडरचा स्फोट (Cylinder Blast) झाला आहे. या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू तर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर स्फोट झाल्याचं समोर आलं आहे. जखमी व्यक्तींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. हा अतिशय भीषण स्फोट होता. या स्फोटामध्ये इमारीतचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं दिसत आहे, तर एका व्यक्तीने जीव गमावलेला आही. मध्यरात्री बाराच्या सुमारास हा स्फोट झाला आहे.

सायन कोळीवाडामधील जय महाराष्ट्र नगर परिसरात ही घटना (Cylinder Explosion In Sion Koliwada Area) घडली आहे. रात्री बाराच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत एकाचा मृत्यू तर दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव (Mumbai News) घेतली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली आहे. सायन कोळीवाडा ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.

बीडमधील घटना

बीडमध्ये जिलेटिनचा स्फोट करून पान टपरी उडवल्याची घटना १० एप्रिल रोजी समोर आली होती. या घटनेमुळे नागिरकांमध्ये एकच (Cylinder Explosion) खळबळ उडाली होती. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे ही घटना घडली होती. विहीर खोदण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिनचा वापर करून स्फोट करण्यात आला होता. या घटनेत टपरी चालक अशोक भालेराव किरकोळ जखमी झाला होता.

Cylinder Blast
Rameshwaram Cafe Blast Case : बेंगळुरुतील रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणी मोठी अपडेट; 'एनआयए'ने आवळल्या दोघांच्या मुसक्या

तेलंगणातील घटना

३ एप्रिल रोजी तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात एका केमिकल कारखान्यात फॅक्टरीत  स्फोट झाला होता. या घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता होती. याबाबत माहिती देताना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, कारखान्यात अजून आठ ते दहा लोक अडकले होते. याचा अर्थ मृतांची संख्या वाढू शकते. स्फोट झाला त्यावेळी इमारतीमध्ये 50 लोक होते, असं स्थानिकांनी सांगितलं होतं. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं होतं की, फार्मास्युटिकल कंपनीच्या रिॲक्टरमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटाच्या प्रभावामुळे (blast news) आजूबाजूचे लोक दूर फेकले गेले होते.

Cylinder Blast
Satara Blast News : सातारा शहरानजीक शासकीय कार्यालयात स्फाेट, परिसर हादरला; अधिका-यांचे ताेंडावर बाेट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com