Mumbai Lake Levels : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा ३० टक्क्यांवर, पण पाणीकपात होणार नाही

Mumbai Lake Water Level : २ फेब्रुवारी रोजी, मंगळवारी, सात पाणलोट क्षेत्रातील तलावांमध्ये वापरण्यायोग्य पाणीसाठा सुमारे 4.3 लाख दशलक्ष लिटर म्हणजे एकूण आवश्यक 14.47 लाख दशलक्ष लिटरच्या सुमारे 30% इतका होता.
Mumbai Water Stock
Mumbai Water StockSaam TV

Water Supply in Mumbai :

राज्यात उन्हाचा पारा वाढत चालला आहे. उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी नागरिकांना पाणीकपातचा सामना करावा लागतो. अशात मुंबईच्या ७ तलावांमध्ये सध्या ३०% पेक्षाही कमी पाणीसाठी शिल्लक आहे. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वाधिक कमी पाणीसाठा आहे. मात्र ३१ जुलैपर्यंत मुंबईकरांना हा पाणीसाठा पुरेल असा विश्वास बीएमसीकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Mumbai Water Stock
Palghar Water Crisis : पालघर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट; धरणांत ४० टक्केच साठा

बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी ही माहिती दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं की, मुंबईच्या तलावांमध्ये ३० टक्क्यांपर्यंतच पाणीसाठा शिल्लक असला तरी देखील मुंबईकरांना पाणीकपात सहन करावी लागणार नाही. कारण मुंबईमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये काही राखीव जलसाठ्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत पाणी पुरेल इतका साठा सध्या उपलब्ध आहे.

हवामान खात्याकडून या महिन्याअखेरीस मान्सून भारतात केव्हा दाखल होणार याबाबत माहिती दिली जाईल. तर ११ जूनपर्यंत मुंबईमध्ये पावसाच्या सरी बरसतील अशी शक्यता आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ पाणलोट क्षेत्रांतील तलावांमध्ये सुमारे 4.3 लाख दशलक्ष म्हणजेच 30% इतका पाणीसाठा आहे. भातसा धरणात (१.४ लाख दशलक्ष लीटर) आणि अप्पर वैतरणा (९३,५०० दशलक्ष लिटर) येथील राखीव पाणीसाठा वाढवण्यात येणार आहे. यासाठी फेब्रुवारीमध्ये राज्य पाटबंधारे विभागाच्या मंजुरी देखील दिली आहे.

योग्य प्रमाणात पाऊस पडल्यास धरणांमध्ये जास्तीचा पाणीसाठा राखीव करता येतो. ज्यावेळी धरणांमधील पाणीसाठा संपत येतो त्यावेळी राखीव पाणीसाठा वापरला जातो. मुंबईत मुबलक पाऊस पडल्याने मुंबईकरांच्या डोक्यावर पाणीकपातची टांगती तलवार नाही. मात्र महाराष्ट्रात अन्य काही जिल्ल्ह्यांमध्ये मोठी पाणीटंचाई दिसत आहे.

Mumbai Water Stock
Water Scarcity : अवलकोंडा तलावात पुढील आठ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा; उदगीर परिसरात पाणीटंचाईची गंभीर समस्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com