लिंबोणीच्या शेतात अंमली पदार्थाची लागवड; श्रीगोंदा पोलिसांची कारवाई!

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शिवारात पोलिसांनी छापा टाकून एका शेतामध्ये सुमारे ८ लाख ९५ हजार रुपयाचा गांजा जप्त केला आहे.
लिंबोणीच्या शेतात अंमली पदार्थाची लागवड;
लिंबोणीच्या शेतात अंमली पदार्थाची लागवड; सचिन आगरवाल
Published On

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शिवारात पोलिसांनी छापा टाकून एका शेतामध्ये सुमारे ८ लाख ९५ हजार रुपयाचा गांजा जप्त केला आहे. कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंदा पोलिसांनी संयुक्त कारवाई मध्ये हा गांजा जप्त करून दोन इसमांना ताब्यात घेतले आहे.

हे देखील पहा :

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.३० रोजी गुप्त बातमीदारामार्फत उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना माहिती मिळाली की, श्रीगोंदा शिवारातील जगताप वस्ती, दत्तवाडी लोखंडेवाडीमधील शेत जमीन गट नंबर ७००, ७०१ यामध्ये लिंबोणीच्या झाडांच्या मध्ये गांजाची लागवड केली आहे.

सदर माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव व श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व पोलीस पथक हे श्रीगोंदा शिवारातील दत्तवाडी लोखंडेवाडीच्या मध्ये जगताप वस्ती या ठिकाणी जाऊन छापा टाकला.

लिंबोणीच्या शेतात अंमली पदार्थाची लागवड;
मुख्यमंत्री फक्त बोलघेवडे, आर्यनचं सोडा मुंडेंच्या परळीत 300 किलो गांजा सापडला : मेटे

छाप्यात या ठिकाणी लिंबोंणीच्या शेतामध्ये गांजाची लहान-मोठ्या झाडांची लागवड केलेली होती. सदर ठिकाणी छापा टाकून तेथे हजर असणारे दोन इसम यात अरुण हरिभाऊ जगताप ५६ व बाळू हरिभाऊ जगताप वय ५९ दोघे राहणार श्रीगोंदा शिवार अशा दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले. सदर छाप्यात गांजाची लहान-मोठी हिरवेगार पाला असणारी झाडे ताब्यात घेण्यात आली. यामध्ये एकूण ८ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com