CTET Results 2021: आज जाहीर होणार सीटीईटी निकाल, जाणून घ्या सविस्तर

केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणीचा निकाल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज प्रसिद्ध केला जाईल.
CTET Results 2021: आज जाहीर होणार सीटीईटी निकाल, जाणून घ्या सविस्तर
CTET Results 2021: आज जाहीर होणार सीटीईटी निकाल, जाणून घ्या सविस्तरSaam Tv
Published On

मुंबई: केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET) २०२१ चा निकाल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज १५ फेब्रुवारी २०२२ ला प्रसिद्ध केला जाणार आहे. परीक्षेमध्ये बसलेले उमेदवार निकाल जाहीर झाल्यावर अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन निकाल तपासू शकणार आहेत. CTET २०२१ ची परीक्षा १६ डिसेंबर ते ३० जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये देशात विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. (CTET results will be announced today)

CBSE ने १ फेब्रुवारी रोजी CTET answer -key प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर आक्षेप नोंदवण्याकरिता ४ फेब्रुवारीपर्यंत वेळ देण्यात आली होती. यानंतर हरकत नोंदवण्याची मुदत संपली आहे. CET च्या उत्तरपत्रिकेअगोदर बोर्डाने (Board) परीक्षेची प्रश्नपत्रिका (Question paper) आणि उत्तरपत्रिका (Answer sheet) देखील प्रसिद्ध केली होती. ज्या उमेदवारांनी (candidates) ही परीक्षा दिली होती.

हे देखील पहा-

आता तुम्ही CTET answer -key डिसेंबर २०२१ PDF व्दारे (ctet answer key २०२१) तपासू शकणार आहे. तुम्ही CBSE CTET च्या वेबसाईटवर भेट देऊ शकता. किंवा या बातमीत पुढे दिलेल्या थेट लिंकवरती क्लिक करून तुम्ही CTET 2021 answer -key डाउनलोड करू शकणार आहे. सीटीईटीच्या उत्तरपत्रिकेअगोदर बोर्डाने परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली होती.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे (CTET) २ वेगवेगळे पेपर घेण्यात येत आहेत. पेपर- १ हा इयत्ता १ ते ५ पर्यंत शिकवण्यासाठी पात्र उमेदवारांच्या निवडीकरिता घेतला जातो. तर इयत्ता ६ वी ते ८ वी चे शिक्षक होण्याकरिता पेपर २ घेतला जातो. विशेष बाब म्हणजे CTET २०२१ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्र आयुष्यभराकरिता वैध असणार आहे. त्याचा थेट फायदा उमेदवारांना आता होणार आहे.

CTET Results 2021: आज जाहीर होणार सीटीईटी निकाल, जाणून घ्या सविस्तर
Hijab Row Highlights: कर्नाटक हिजाब प्रकरणी आज सुनावणी

या पद्धतीने तपासा निकाल

-CTET निकाल तपासण्याकरिता उमेदवारांनी अधिकृत CTET वेबसाइट ctet.nic.in ला भेट दयावे.

-यानंतर, मुख्यपृष्ठावर, खाली स्क्रोल करा आणि CTET डिसेंबर २०२१ निकाल या लिंकवर क्लिक करा.

-उमेदवारांना दुसर्‍या पृष्ठावर त्यांना CTET रोल नंबर आणि जन्मतारीख वापरून डॅशबोर्डवर लॉग इन करावे.

-CTET २०२१ चा निकाल स्क्रीनवर दिसणार आहे.

-यानंतर, परिणाम तपासा आणि डाउनलोड करा.

-वापरासाठी स्क्रीनशॉट किंवा प्रिंटआउट काढून घ्यावे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com