वृत्तसंस्था: कर्नाटकमध्ये (Karnataka) हिजाब (Hijab) प्रकरणी आज उच्च न्यायालयामध्ये (High Court) सुनावणी पार पडणार आहे. कर्नाटक (Karnataka) उच्च न्यायालयामध्ये दुपारी २.३० वाजेच्या सुनावणी सुरू होणार आहे. याअगोदर सोमवारी न्यायमूर्ती (Justice) कृष्णा दीक्षित यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती दीक्षित यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या ३ न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठाकडे पाठवले आहे. (Hijab Controversy Karnataka hijab case to be heard today)
सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली सरकार मूलभूत अधिकारांवर बंधने घालू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने यावेळी सांगितले आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीच्या दरम्यान ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार की, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीकडे (CDC) गणवेशावर नियम तयार करण्याकरिता कोणता देखील कायदेशीर वैधानिक आधार नाही. हिजाब घालणे ही इस्लामी धर्माची अनिवार्य प्रथा आहे.
हे देखील पहा-
जोपर्यंत मुख्य धार्मिक प्रथा संबंधित आहेत, त्या अनुच्छेद २५(१) मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. सुनावणीच्या दरम्यान, एका वकिलाने या मुद्द्यावर मीडिया (Media) आणि सोशल मीडियावर (Social media) टिप्पण्यांवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या अर्जाचा संदर्भ दिला आणि इतर राज्यात निवडणुका होईपर्यंत हे प्रकरण पुढे ढकलण्यात यावे. यावर उच्च न्यायालयाने सांगितले आहे की, निवडणूक आयोगाने किंवा काही अधिकाऱ्यांनी ही विनंती केल्यास आपण त्यावर विचार करू शकणार आहे.
काय आहे हे प्रकरण?
हे प्रकरण उडुपी येथे एका महाविद्यालयात सुरू झाले आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये ६ मुली हिजाब परिधान करून वर्गात आल्या आणि प्रत्युत्तर म्हणून हिंदू विद्यार्थी भगवे उर्पण घालून महाविद्यालयात आले होते. हळूहळू हा वाद राज्याच्या इतर भागामध्ये पसरला. यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये तणाव आणि अनेक ठिकाणी हिंसाचार झाला आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.