Airoli news
Airoli news Saam TV

Airoli Crime Video : निर्दयीपणाचा कळस! ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मारहाण; धक्कादायक घटनेचा VIDEO पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

रबाळे पोलीस ठाण्यात केयर टेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Crime News : ऐरोली येथील साई केअर सेंटरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नवी मुंबईतील ऐरोलीमधील साई केयर सेंटर या वृद्धाश्रमात एका ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करण्यात आली आहे. येथे काम करणाऱ्या केअर टेकरने ही मारहाण केले आहे. यासंदर्भातील एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर समाजसेवकांच्या तक्रारीवरून रबाळे पोलीस ठाण्यात केयर टेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Vrudhashram)

वृद्ध व्यक्ती आणि एखादं लहान मुलं हे सारखेच असतात. ते कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करतात. यामध्ये अनेक व्यक्तींना असे वाटते की, वृद्ध आजी किंवा आजोबा मुद्दाम आपल्याला त्रास देण्यासाठी असे करत आहेत. मात्र तसे नसून त्यांची बुद्धी अगदी लहान मुलांसारखी झालेली असते. त्यामुळे वृद्ध व्यक्ती जास्त हट्टीपणा करतात, असं अनेक डॉक्टर मंडळी सांगतात. मात्र तरी देखील अशा घटना वृद्धाश्रमातून समोर येत आहेत.

Airoli news
Pune Crime News: धक्कादायक! 50 हजारांसाठी पुण्यातील अल्पवयीन मुलीला मध्य प्रदेशमध्ये विकले

साई केयर सेंटर या वृद्धाश्रमात ८६ वर्षीय आजोबांना मारहाण करण्याची घटना गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे मारहाण करणाऱ्या वक्तीला जगासमोर आणण्यासाठी एका व्यक्तीने गपचूप या घटनेचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये शूट केला आहे. ऐरोली (Airoli ) हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील शेअर करण्यात आलाय. व्हिडिओ पाहून नेटकरी यावर संताप व्यक्त करत आहेत.

ज्या वृद्ध व्यक्तींच्या आयुष्यात म्हातारपणी त्यांची काळजी घेण्यासाठी कोणी नसते ते वृद्धाश्रमात राहण्याचा पर्याय निवडतात. तसेच काही घरांमध्ये निर्दयी मुलं स्वत: आपल्या थकलेल्या आई बाबांना आश्रमात सोडून येतात. वृद्ध नागरिकांच्या जीवाची अशी हेळसांड कधी थांबणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.

Airoli news
Pune Crime News: पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने मागितली तीन कोटींची खंडणी; दोघांविरुद्ध गुन्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com