Mumbai: नायगावातल्या रहिवाशी भागात क्रेन कोसळली; वाहनांचं मोठं नुकसान...

Crane Accident In Mumbai: ही क्रेन तेथील उभ्या असलेल्या गाड्यांवर पडल्याने गाड्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
Naigaon, Mumbai Crane Accident
Naigaon, Mumbai Crane Accidentसुरज सावंत
Published On

मुंबई: मुंबईच्या दादर येथील नायगांव (Naigaon) परिसरात मेट्रोच्या पिलरचे रंगरंगोटीचे काम सुरू असताना, जी. डी. आंबेकर मार्गावर उभी क्रेन (Crane) रहिवाशी रहात असलेल्या परिसरात पडल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी रंगकाम (Painting) करणारे दोन कर्मचारी या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. (Crane crashes in Mumbai's Naigaon residential area; Major damage to vehicles...)

हे देखील पहा -

Naigaon, Mumbai Crane Accident
शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उघड; माजी आमदाराच्या गटाने टाकला लेटर बाॅम्ब

या दोघांवर परळच्या केईएम रुग्णालयात (KEM Hospital) उपचार सुरू आहेत. ही क्रेन तेथील उभ्या असलेल्या गाड्यांवर पडल्याने गाड्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. शर्तीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाने रहिवाशी रहात असलेल्या परिसरात पडलेली क्रेन बाहेर काढली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com