पुणे : पिंपरी - चिंचवडPCMC शहरातील मोकाट फिरणाऱ्या भटक्या गाईंcow - गुरासाठी महापालिकेने तात्काळ गायरान जमीन उपलब्ध करून द्यावी या मागणी साठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आंदोलन केले आहे. तसेच जोपर्यंत महापालिका भटक्या गाई-गुरांसाठी गायरान जमीन देत नाही तोवर आम्ही महापालिकेच्या दारासमोरून गाई-गुरु सोडणार नाही अशी भूमिकाही विश्व हिंदू परिषदेचेVHP कार्यकर्त्यांनी घेतली आहे.Cows built by VHP workers in front of Pimpri-Chinchwad Municipal Corporation
हे देखील पहा-
आपल्या देशात असो वा राज्यात गाई वरुण सतत राजकारण होत असतं, गाई ही श्रध्दास्थान आहे का नाही यावरती दुमतं असतीलही, मात्र गाय हा राजकारणाचा मुद्दा आहे यावरती मात्र कुणाचेही दुमत नसणार आहे. याचीच प्रचिती सर्वांना सर्व शहरात येते.
आधी गोहत्या बंदीसाठी कायदा करा म्हणून आंदोलन होत असतं आणि आता भटक्या गाईंसाठी निवारा द्या म्हणून याचा त्रास सामान्य नागरिकांना वाहणधारकांना होतोच मात्र त्या मुक्या जनावरांनाही होतो त्यामुळे त्यांना निवारा करा ही मागणी रास्त आहेच मात्र ती पुरेशी नाही.
तसेच गाईंसाठी निवारा ही केवळ सरकारचीच किंवा महापालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांने यासाठी काही तरी प्रयत्न करायला हवेत. एकीकडे बैलगाडा शर्यतीवरुन राजकारण पेटत असतानाच गाई-गुरांवरुनही आंदोलन पेटायला लागली असं म्हणायला हरकत नाही.
Edited By-Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.