'लसीकरण आपल्या दारी' एक अभिनव उपक्रम

पोतराज, नंदीवाले यांनी दिली जनजागृती करून लस
'लसीकरण आपल्या दारी' एक अभिनव उपक्रम
'लसीकरण आपल्या दारी' एक अभिनव उपक्रमसागर आव्हाड
Published On

पुणे - शहरात १०८ टक्के लसीकरण झाल्याची माहिती नुकतीच पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. यामध्ये अनेक लोकांकडे आधार कार्ड नसतात. ओळख पत्र नसते, अशा अनेक अडचणी येतात. परंतु लसीकरण आपल्या दारी हा उपक्रम पुण्यातील बेघर वंचित लोकांसाठी आशादायी ठरत आहे.

हे देखील पहा -

वंचित समाज पोतराज, गोधडी शिवण्याचा व्यवसाय करणारे, नंदिवाला या समाजात लसीकरणाबाबत अंधश्रद्धा होती. त्यानंतर या भागात घरोघरी जाऊन लस देण्यात आली आहे. वयोवृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिक असे लोक घरातून बाहेर पडू शकत नाहीत.

'लसीकरण आपल्या दारी' एक अभिनव उपक्रम
होय, मी मोठी नाहीच पण...; शरद पवारांच्या वक्तव्यावरती पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

अनेकांमध्ये लसीकरण विषयी जागृती नाही आहे अशा लोकांसाठी हा उपक्रम असून कात्रजमधील प्रगती फाऊंडेशन आणि विलू पुनावाला मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने घरोघरी जाऊन लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम ८ ऑक्टोबर पासून कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात राबविण्यात येत आहे. प्रतिक कदम यांच्या संकल्पनेतून कोरोनावर मात करण्यासाठी परिसर १०० टक्के लसीकरणयुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी परिसरातील प्रत्येक घरी जाऊन लस देण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com