Corona Third Wave | मुंबईकरांनो सावधान! मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता

मुंबई शहरावर कोरोनाचे संकट पुन्हा एकदा डोकेवर काढू लागले आहे. कोरोना रुग्णसंख्या आता महिना अखेरीस 13 पट वाढलीये.
मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता
मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यताSaam Tv
Published On

मुंबई : मुंबई शहरावर कोरोनाचे संकट पुन्हा एकदा डोकेवर काढू लागले आहे. कोरोना रुग्णसंख्या आता महिना अखेरीस 13 पट वाढलीये. जानेवारीच्या मध्यास ती फोफावणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता मुंबई शहरावर तिसऱ्या लाटेचं सावट असल्याने महापालिका प्रशासनासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. (Corona Third Wave is expected in Mumbai Corona Patients Increases)

राज्यात ओमिक्रॉनच्या केसेस वाढत चालल्या असून एकूण रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे मुंबई आणि MMRDA परिसरात असल्याचं आढळून आलं आहे. तर दुसरीकडे, मुंबईमध्ये एकाच दिवशी कोरोनाची (Corona) धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

हेही वाचा -

मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता
Corona Update | महाराष्ट्रात 216 दिवसांनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण, पुन्हा लॉकडाऊन होणार का?

मुंबईत रविवारी 922 रुग्ण आढळले होते, सोमवारी 809 रुग्ण आढळले होते. पण मंगळवारी 1,377 रुग्ण सापडले. म्हणजे एका दिवसात 500 रुग्ण वाढले आहेत. ही आकडेवारी आणि त्यात तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पहिल्या, दुसऱ्या लाटेप्रमाणे आता तिसरी लाट येणार हे जवळ जवळ निश्चित झाले आहे.

मुंबई पालिका प्रशासनाने ही भीती लक्षात घेत बैठकांचे सत्र सुरु केले आहे. या बैठकांना पालकमंत्री ही सहभागी होत आढावा घेत आहेत. राज्यसरकारची नियमावली लक्षात घेत रुग्ण संख्या रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याची चाचपणी सुरु झाली आहे.

मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता
Omicron in Delhi: सी.एम. केजरीवालांनी केले नवे निर्बंध जाहीर, म्हणाले, गर्दी दिसल्यास...

मुंबईच्या एकूण रुग्ण संख्येकडे एक लक्ष टाकूया

मुंबईत 1,377 रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या 7,73,298 झाली. एकूण 338 रुग्ण बरे झाले. त्यामुळे बरे झालेल्यांची एकूण संख्या 7,48,537 झाली. त्यात एका रुग्णाचा मृत्यू झालाय. मृतांची एकूण संख्या 16,374 झालीये.

त्यात आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. वेळ पडल्यास नियम मोडणाऱ्या आस्थापना थेट सील करण्याची तयारी ही करण्यात आलीये. कोरोना संकट अधिक वाढले, तर शाळा ही बंद करायच्या का याचा निर्णय वेळ आल्यावर घेण्याची तयारी ही केली जात आहे, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

यामुळे मुंबईकरांनो कोरोना गेला नाही तर तो पुन्हा त्याच वेगाने येतोय याचे भान ठेवा. नियम पाळा आणि कोरोना टाळा.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com