सुशांत सावंत
मुंबई : ‘कोविड - १९’ विषाणूच्या जनुकीय सूत्रांचे (corona) निर्धारण हे ऑगस्ट २०२१ पासून नियमितपणे व फेरीनिहाय करण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal singh chahal) यांच्या निर्देशांनुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत असलेल्या या कार्यवाही अंतर्गत बाराव्या फेरीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे (corona test) निष्कर्ष नुकतेच हाती आले आहेत. या १२ व्या फेरीतील चाचण्यांसाठी २७९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली.
यापैकी २०२ नमुने मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील होते. तर उर्वरित नमुने हे मुंबई मनपा क्षेत्राबाहेरील होते. मुंबई महापालिका क्षेत्रातील २०२ नमुन्यांपैकी ९९.५% अर्थात २०१ नमुने हे ‘ओमिक्रॉन’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. तर एक नमुना हा डेल्टा या उपप्रकाराने बाधित आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कळविण्यात आले आहे की, कोविड विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्यामुळे एकाच विषाणुच्या २ किंवा अधिक प्रजातींमधील फरक ओळखू येतो.
ज्यामुळे या अनुषंगाने उपचार करण्याची नेमकी दिशा निश्चित करणे सुलभ होते. परिणामी, ज्या रुग्णांना कोविड बाधा झाली आहे, त्यांच्यावर अधिक परिणामकारक उपचार करणेही शक्य होते. या चाचण्यांचे विविध परिमाणांच्या आधारे करण्यात आलेले मुद्देनिहाय विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.
२०२ चाचण्यांचे वयोगटानुसार विश्लेषण
• १२ व्या फेरीतील चाचणींच्या निष्कर्षांचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता, २०२ रुग्णांपैकी ४४% अर्थात ८८ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत.
• तर ४१ ते ६० या वयोगटात देखील २६% म्हणजेच ५२ एवढेच रुग्ण आहेत.
• १६% म्हणजेच ३२ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील आहेत.
• १२% म्हणजेच २४ रुग्ण हे '० ते २०' या वयोगटातील; तर २% म्हणजे ५ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटातील आहेत.
चाचण्या करण्यात आलेल्या २०२ नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील २४ नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, १ नमुना हा ० ते ५ वर्षे या वयोगटातील, १० नमुने ६ ते १२ वर्षे या वयोगटातील; तर १३ नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. हे सर्व नमुने ‘ओमिक्रॉन’ या कोविड विषाणूच्या उप प्रकाराने बाधित असल्याचे आढळून आले. या रुग्णांना कोविड बाधा झाल्याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत.
२०२ चाचण्यांचे लसीकरणानुसार विश्लेषण
• ‘कोविड’ प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या आधारे विश्लेषण केले असता, २०२ पैकी २ रुग्णांनी लशीची केवळ पहिली मात्रा घेतलेली होती.
• लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या १२९ रुग्णांपैकी ९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी एका रुग्णास अतिदक्षात विभागात दाखल करावे लागले.
• एकूण रुग्णांपैकी ७१ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी ९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर २ रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.
• २०१ ओमायक्रोन या उप प्रकाराने बाधित रुग्णांपैकी बी.ए. ४ चे तीन आणि बी ए.५ व्हेरीयटं चा एक रुग्ण आढळला.
हे सर्व रुग्ण १४ मे ते २४ मे २०२२ या कालावधीतील असनू त्यातील दोन ११ वर्षाच्या मुली तर दोन ४० ते ६० वर्षे वयोगटातील पुरुष आहेत.
हे सर्व रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत आणि मागील १५ दिवसमध्ये त्यांनी बाहेच्या देशात किंवा राज्यात प्रवास केलेला नाही.
• बी.ए. ४ च्या तीन रुग्णांपैकी ११ वर्षाच्या मुली लसीकरणाच्या वयोगटात मोडत नाही व उर्वरित एक रुग्ण ऍलर्जीने बाधित असल्यामुळे त्याने देखील लसीची एकही मात्र घेतली नाही.
• बी ए.५ व्हेरीयटं चा एक रुग्णाने लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत.
दरम्यान, विविध उप प्रकारातील कोविड विषाणुची होणारी लागण लक्षात घेता, ‘कोविड - १९’ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘मास्क’चा सुयोग्य वापर, दोन किंवा अधिक व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखणे, नियमितपणे व सुयोग्य प्रकारे साबण लावून हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. तरी, सर्व मुंबईकर नागरिकांनी या उपाययोजनांची कटाक्षाने व कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे विनम्र आवाहन संजीव कुमार यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा मनपा प्रशासनाच्या वतीने केले आहे.
पहिल्या फेरीतील चाचणी - ‘नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब’ मध्ये पहिल्या टप्प्यातील (फर्स्ट बॅच) चाचण्यांचे निष्कर्ष ऑगस्ट २०२१ मध्ये जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कोविड बाधा झालेल्या १८८ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. ज्यामध्ये १२८ रुग्ण हे ‘डेल्टा’ या उप प्रकारातील ‘कोविड’ विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. तर इतर नमुन्यांमध्ये ‘अल्फा’ या उप प्रकारातील २, केपा या उप प्रकारातील २४ व इतर नमुने हे सर्वसाधारण प्रकारच्या ‘कोविड’ विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले होते.
दुस-या फेरीतील चाचणी - ‘नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब’ मध्ये दुस-या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष सप्टेंबर २०२१ मध्ये जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार ‘कोविड’ बाधा झालेल्या ३७६ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी ३०४ रुग्ण हे ‘डेल्टा व्हेरिअन्ट’ या उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. तर इतर नमुन्यांमध्ये ‘नाईन्टीन-ए’ या उप प्रकारातील २, ‘द्वेन्टी-ए’ या उप प्रकारातील ४ व इतर नमुने हे सर्वसाधारण प्रकारच्या कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले होते.
तिस-या फेरीतील चाचणी - ‘नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब’ मध्ये तिस-या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष ऑक्टोबर २०२१ मध्ये जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कोविड बाधा झालेल्या ३४३ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी १८५ रुग्ण हे ‘डेल्टा व्हेरिअन्ट’ या उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. तर इतर नमुन्यांमध्ये ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या उप प्रकारातील ११७ व इतर नमुने हे सर्वसाधारण प्रकारच्या कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले होते.
चौथ्या फेरीतील चाचणी - ‘नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब’ मध्ये चौथ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष नोव्हेंबर २०२१ मध्ये जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कोविड बाधा झालेल्या २८१ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी २१० रुग्ण हे ‘डेल्टा व्हेरिअन्ट’ या उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. तर इतर नमुन्यांमध्ये ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या उप प्रकारातील ७१ व इतर नमुने हे सर्वसाधारण प्रकारच्या कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले होते.
पाचव्या फेरीतील चाचणी - ‘नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब’ मध्ये पाचव्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष डिसेंबर २०२१ मध्ये जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कोविड बाधा झालेल्या २२१ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी २४ रुग्ण हे ‘डेल्टा व्हेरिअन्ट’ या उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. तर इतर नमुन्यांमध्ये ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या उप प्रकारातील १९५, तर २ नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. उर्वरित नमुने हे सर्वसाधारण कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले होते.
सहाव्या फेरीतील चाचणी - ‘नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब’ मध्ये सहाव्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष १५ डिसेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कोविड बाधा झालेल्या २९७ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी १८३ रुग्ण (६२ टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. तर इतर नमुन्यांमध्ये ‘डेल्टा व्हेरिअन्ट’ या उप प्रकारातील १०५ (३५ टक्के), ७ नमुने (२ टक्के) हे ‘ओमायक्रॉन’ या उप प्रकाराने; तर उर्वरित १ टक्का नमुने हे इतर उप प्रकाराने बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. उर्वरित नमुने हे सर्वसाधारण कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले होते.
सातव्या फेरीतील चाचणी - ‘नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब’ मध्ये सातव्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष ३१ डिसेंबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार कोविड बाधा झालेल्या २८२ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी १५६ रुग्ण (५५ टक्के) हे ‘ओमायक्रॉन’ या उप प्रकाराने; ८९ रुग्ण (३२ टक्के) ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. तर उर्वरित ३७ नमुने (१३ टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअन्ट’ या उप प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले होते.
आठव्या फेरीतील चाचणी - ‘नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब’ मध्ये ८ व्या फेरीतील चाचण्यांसाठी ३७३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २८० नमुने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील होते, तर उर्वरित नमुने हे बृहन्मुंबई मनपा क्षेत्राबाहेरील होते. बृहन्मुंबई मनपा क्षेत्रातील २८० नमुन्यांपैकी ८९% अर्थात २४८ नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले. ८% अर्थात २१ नमुने हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या उप प्रकाराने; तर उर्वरित सुमारे सुमारे ३% अर्थात ११ नमुने हे इतर उपप्रकारांचे असल्याचे आढळून आले आहे. या ११ नमुन्यांपैकी २ नमुने हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले होते.
नवव्या फेरीतील चाचणी - ‘नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब’ मध्ये ९ व्या १९० रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले होते. यात ‘ओमायक्रॉन’ चे ९४.७४ टक्के रुग्ण आढळले आहेत. या १९० पैकी २३ रुग्णांचा मृत्यू ओढवला. पैकी २१ रुग्ण हे ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे व सहव्याधीग्रस्त होते. एवढेच नव्हे तर या २३ पैकी १५ जणांनी कोविड लसीचा एकही डोस घेतला नव्हता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.