Controlled Explosion Demolition: कंट्रोल्ड एक्स्ल्पोजन सिस्टिम म्हणजे काय? Edifice Engineering या कंपनीनं कसा पाडला पुण्यातील चांदणी चौक पूल

Edifice Engineering Latest News: नियंत्रित स्फोटाद्वारे पाडकाम करण्याला प्रक्रियेला कंट्रोल्ड एक्स्प्लोजन असे म्हणातात.
Controlled Explosion Demolition By Edifice Engineering
Controlled Explosion Demolition By Edifice EngineeringSaam TV
Published On

Chandni Chowk Bridge Demolished: पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक (Traffic) कोंडी फोडण्यासाठी नवीन उड्डाणपूल (Bridge) उभारण्यात येत आहे. त्यामुळे जुना पूल हा आज, २ ऑक्टोबरला मध्यरात्री १ वाजता पाडण्यात आला. हा पूल पाडण्यासाठी एडिफिस इंजीनियरिंग (Edifice Engineering Demolition Contractors : Concrete & Core cutting Building Demolition in Mumbai India) या कंपनीला जबाबदारी देण्यात आली होती. अवघ्या ६ सेकंदात हा पूल जमीनदोस्त करण्यात आला, तसेच उरलेला काही भाग हा जेसीबीद्वारे पाडण्यात आला. हे पाडकाम कंट्रोल्ड एक्स्ल्पोजन सिस्टिमद्वारे (controlled explosion system) करण्यात आले. (Pune Latest News)

पाहा व्हिडिओ -

कंट्रोल्ड एक्स्प्लोजन म्हणजे काय? ते कसे केले जाते?

नियंत्रित स्फोटाद्वारे पाडकाम करण्याला प्रक्रियेला कंट्रोल्ड एक्स्प्लोजन असे म्हणातात. बिल्डिंग इम्प्लोशन म्हणजे स्फोटक सामग्रीचे स्थान आणि त्यांच्या स्फोटाची वेळ ज्यामुळे एखादी वास्तू काही सेकंदात कोसळते. ज्यामुळे त्याच्या जवळच्या परिसराचे भौतिक नुकसान कमी होते. बिल्डिंग इम्प्लोशनमध्ये पूल, स्मोकस्टॅक्स, टॉवर आणि बोगदे यासारख्या इतर संरचनांचे नियंत्रित स्फोटदेखील समाविष्ट आहे.

कंट्रोल्ड एक्स्प्लोजनचे फायदे

  • इमारतीमध्ये खास प्रकारची स्फोटके फिट केली जातात

  • एकाचवेळी त्यांच्यात स्फोट घडवून आणला जातो

  • कमीत-कमी वेळेत पाडकाम केले जाते 

  • या पद्धतीमुळे आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण होत नाही 

  • इमारतीचा ढिगारा दूरपर्यंत पसरत नाही 

ट्विन टॉवरदेखील याच कंपनीने पाडले होते

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडामध्ये असलेला 'ट्विन टॉवर' अल्पावधीतच पाडला होता. ही इमारत नोएडाच्या सेक्टर-९३ मध्ये होती. यात सुमारे ८५० फ्लॅट्स होते. वर्षानुवर्षे मेहनत आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्यानंतर बांधलेली ही इमारत काही सेकंदात कोसळली होती. या दोन्ही इमारतींची उंची सुमारे १०० मीटर होती. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले होते. हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी ४६ जणांची टीम काम करत होती. ही टीम दररोज सुमारे १२ तास स्फोटकं लावण्याचं काम करत होती. स्फोटकांच्या मदतीनं अवघ्या तीन मिनिटांत एपेक्स आणि सायन नावाचे दोन टॉवर जमीनदोस्त झाले आहेत. बांधकाम पाडण्यासाठी ३५०० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. यासंदर्भात सुरक्षा व्यवस्थाही मजबूत करण्यात आली होती.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com