Ola: बॅग्ज भरल्या, हाँगकाँगला जायची तयारीही झाली, पण कॅब आलीच नाही; ग्राहक आयोगाकडून ओलाला 10 हजाराचा दंड

कॅब वेळेत नआल्याने ग्राहकाने थेट ग्राहक निवारण केंद्राकडे तक्रार केली.
Ola
OlaSaam Tv
Published On

पुणे: परदेशात प्रवासासाठी घरुन विमानतळावर जाण्यासाठी एका ग्राहकाने ओला कंपनीची कॅब बुक केली. मात्र, कॅब वेळेत नआल्याने ग्राहकाने थेट ग्राहक निवारण केंद्राकडे तक्रार केली. त्याची दखल घेत ग्राहक मंचाने ओला कंपनीला 10 हजार रुपये दंड आणि तक्रारीचा खर्च म्हणून 3 हजार रुपये नुकसान भरपाई असे एकूण 13 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत (Consumer Commission orders Ola to pay Rs 13000 due to untimely arrival of cab).

Ola
OLA S1 इलेक्ट्रिक स्कूटर अखेर भारतात लॉंच, जाणून घ्या किंमत

वेळेवर कॅब आलीच नाही

पुण्यात ही घटना घडलीये. पुणे (Pune) येथील निवृत्त कर्नल अरुण दातार आणि त्यांच्या पत्नी अंजली दातार हे दोघे 17 सप्टेंबर 2018 ला आपल्या मुलीकडे हाँगकाँगला जाणार होते. त्यांनी त्यासाठी आपल्या घरुन पुणे विमानतळाला जाण्यासाठी ओला (Ola) च्या अॅपवर कॅब बुक केली.

ठरलेल्या दिवशी दातार दाम्पत्य त्यांच्या घराच्या दुसऱ्या माजल्यावरुन आपल्या बॅगा घेऊन खाली गेटमध्ये कॅबची वाट पाहत थांबले. परंतु ठरल्याप्रमाणे कॅब साडेचार वाजता आलीच नाही. त्यानंतर कंपनीकडूनही कोणताही मेसेज आला नाही.

शेवटी या दाम्पत्याने कॉल सेंटरला संपर्क साधला. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी ही आम्ही काहीही मदत करु शकणार नाही, असे सांगितले. शेवटी संध्याकाळची वेळ असल्यामुळे दुप्पट रक्कम मोजून ट्राफिकचा सामना करत हे दाम्पत्य दुसऱ्या वाहनाने विमानतळाला पोहोचले. त्यानंतर परदेशातील पुढचा प्रवास झाला.

ओलाच्या फेसबुकवर ओलाचा वाईट अनुभव पोस्ट

हाँगकाँगला पोहचल्यानंतर या दाम्पत्याने ओलाच्या फेसबुक पेजवर कॅबचा आलेला अनुभव पोस्ट केला. मात्र, तो मेसेज कंपनीने ताबडतोब काढुन टाकला. त्यानंतर या दाम्पत्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कोषध्यक्ष विलास लेले यांच्याशी संपर्क केला आणि जुलै 2019 रोजी ग्राहक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

एकंदरीत आठ ते नऊ तारखा आयोगात झाल्या. त्यापैकी तीनवेळा ओला कंपनीचे वकील बाजू मांडण्यासाठी उपस्थित होते. मात्र, त्यांच्याकडे बचाव करण्यासाठी काहीच नव्हते.

ग्राहक न्यायालयाने ओलाला दंड ठोठावला

सर्व बाजूची पडताळणी केल्यानंतर 15 फेब्रुवारी 2022 ला ग्राहक आयोगाने दातार दाम्पत्याच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाने ओला कंपनीला 10 हजार रुपये दंड आणि तक्रारीचा खर्च म्हणून 3 हजार रुपये नुकसान भरपाई, असे एकूण 13 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com