सोनिया गांधींचा उद्धव ठाकरेंना थेट फोन, अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा

भारत जोडो यात्रे संदर्भात काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अतुल लोंढे यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची पोलीस महासंचालक कार्यालयात भेट घेतली.
Sonia Gandhi And Uddhav Thackeray
Sonia Gandhi And Uddhav ThackeraySaam TV
Published On

रश्मी पुराणिक -

मुबंई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला असून ही निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढविणार असल्याची भूमिका काँग्रेसने जाहीर केली आहे. (Andheri East Assembly By-Election)

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी फोनवरून चर्चा करत या पोटनिवडणुकीमध्ये आपला पाठिंबा असल्याचं सांगत, त्यांना शुभेच्छा दिल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ -

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रे संदर्भात काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अतुल लोंढे यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची पोलीस महासंचालक कार्यालयात भेट घेतली.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती दिली. थोरात म्हणाले, सोनिया गांधी यांनी फोन वरून उद्धव ठाकरे यांना अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं. शिवाय गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देखील दिल्या असून आम्ही ही निवडणूक एकत्र लढवणार आहे.

Sonia Gandhi And Uddhav Thackeray
Raj Thackeray : उद्धव ठाकरेंना सहानभुती मिळतेय हा भ्रम आहे; राज ठाकरेंचा जोरदार टोला

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 3 नोव्हेंबरला महाराष्ट्रात पोहचत आहे. या यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये. या यात्रेला गालबोट लागू नये म्हणून महासंचालकांची भेट घेतली असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितलं.

तसंच अंधेरी पोट निवडणूक आम्ही एकत्र लढविणार असल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महाविकास आघाडी म्हणून ती जागा ४० ते ५० हजार मतांनी निवडून आणणार असल्याचा विश्वासही पटोलेंनी व्यक्त केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com