कल्याण-डोंबिवलीत राजकीय घडामोडींना वेग; ठाकरेंना हादरा बसणार, काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

kalyan dombivli news : कल्याण-डोंबिवलीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कल्याणमध्ये उद्धव ठाकरेंना हादरा बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसने स्वबळावर चाचपणी सुरु केली आहे.
kalyan dombivli news
kalyan dombivli news Saam tv
Published On
Summary

काँग्रेसकडून केडीएमसी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत

महाविकास आघाडी झाली तर स्वागत असेल. परंतु न झाल्यास काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचे पातकरांनी सांगितले

बदलत्या राजकीय घडामोडींमुळे केडीएमसी निवडणुकीत वेगळा रंग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण-डोंबिवली : आगामी केडीएमसी निवडणुकीत काँग्रेसची भूमिका ठाम आणि स्ट्राँग असणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी स्पष्ट केलं आहे. शहरातील बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसने स्वतःची तयारी पूर्ण केली आहे. पक्ष निवडणूक संपूर्ण ताकदीने लढवणार आहे, असा संदेश त्यांनी दिला. काँग्रेस स्वबळावर लढल्यास ठाकरे गटाला फटका बसणार असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाविकास आघाडीबाबत बोलताना पातकर म्हणाले, महाविकास आघाडी झाली तर आम्हाला आनंदच आहे. जर आघाडी झाली नाही, तरी काँग्रेस मागे हटणार नाही.केडीएमसी निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्रपणेही मजबूत लढाई देण्यास तयार आहे.

kalyan dombivli news
Rajesh Agrawal : राज्याला मिळाले मुख्य सचिव, कोण आहेत राजेश अग्रवाल? वाचा सविस्तर

त्यांनी स्पष्ट केले की, महाविकास आघाडीसाठी काँग्रेसचा हात पुढेच असणार. शहरातील विकास, पारदर्शकता आणि जनहिताच्या मुद्द्यांसाठी आम्ही एकत्र येण्यास सकारात्मक आहोत. असे ही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय वातावरणात सुरू झालेल्या हालचालींना वेग आला असताना काँग्रेसच्या या भूमिकेमुळे केडीएमसी निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

kalyan dombivli news
Pune : पुणे जिल्ह्यात किती ठिकाणच्या निवडणुका रद्द झाल्या, वाचा संपूर्ण यादी

कल्याणमध्ये मनसे जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

केडीएमसी निवडणुका जवळ येत असताना राजकीय हालचालींना वेग आलाय. निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का बसलाय. कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी मनसेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलाय. गेल्या काही दिवसांपासून भोईर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी एका भूमीपूजनाच्या कार्यक्रमात त्यांनी भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांनी आणि पत्नी सरोज भोईर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com