Maharashtra Politics: मुंबई महापालिकेतील पालकमंत्री लोढा यांच्या कार्यालयावरून नवा वाद; सभागृहात विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Maharashtra Politics: काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी हा पायंडा चुकीचा असून स्वायत्त संस्थेवर अतिक्रमण करत आहात, अशा शब्दात सत्ताधाऱ्यांना सुनावले.
BMC
BMCsaam tv
Published On

Mumbai News: मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले आहेत. काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी हा पायंडा चुकीचा असून स्वायत्त संस्थेवर अतिक्रमण करत आहात, अशा शब्दात सत्ताधाऱ्यांना सुनावले. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यवस्था उद्धस्त करत असल्याचा आरोप केला आहे. (Latest Marathi News)

मुंबई महापालिकेतील पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयावरून काँग्रेस नेते चांगलेच भडकले. नाना पटोले म्हणाले, 'महापालिकेत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. त्या कार्यालयात माजी नगरसेवक बसतात. हे व्यवस्था उद्धस्त करत आहे. त्याला हरकत घेणार. मुंबई महापालिकेत कार्यालय थाटून कारभार सुरू आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

BMC
Pune Political News : पुण्याचे पालकमंत्री पाहुणे, कधीही कोल्हापूरला जातील; आमदार रवींद्र धंगेकरांची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका

काँग्रेसचे मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'मुंबई महापालिकेत पालकमंत्र्यांचे कार्यालय आहे. माजी नगरसेवक तिथे जाऊन बसतील. हा पायंडा चुकीचा आहे. स्वायत्त संस्था आहे, त्यावर अतिक्रमण करत आहात'.

दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर देताना म्हणाले, 'या प्रश्नाची नोंद घेतली जाईल. लक्षवेधी बाहेरचा प्रश्न उपस्थित करून लक्ष दुसरीकडे वळवणे योग्य नाही'.

मंत्री विखे पाटील म्हणाले, 'पालकमंत्र्यांचे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा महापालिकेत असतात. यात आक्षेप असण्यासारखे काही नाही. त्या जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्र्यावर असते. त्यामुळे योग्य समन्वय करण्यासाठी पालकमंत्र्यांना कार्यालय देणे चुकीचे नाही'.

'शासनाच्या विविध विभागाबरोबर समन्वय करण्यावरून राजकारण करू नये, पालकमंत्र्यांचा अधिकार आहे, त्यांना तिथे कार्यालय करण्याचा अधिकार आहे. मागच्या कार्यकाळात जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालय केले होते, महापालिकेत कार्यालय करणे गैर नाही. विनाकारण सभागृहाची वेळ घेऊ नये, असे मंत्री विखे पाटील म्हणाले. पुढे मंत्री उदय सामंत म्हणाले,'संवाद साधण्यासाठी पालकमंत्र्यांना कार्यालय दिले असेल तर त्यात हरकत कशाला हवी'.

BMC
EC Notice to Sharad Pawar Group: मोठी बातमी! शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस

दरम्यान, दोन्ही मंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर नाना पटोले म्हणाले, 'हे गांभीर्याने घेतले पाहिजे. व्यवस्थेच्या विरोधात जाऊन काम केल्यास त्याचे परिणाम चुकीचे होतात. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त अशा शासकीय कार्यालयात पालकमंत्री कार्यालय करू शकतात'.

'महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या स्वायत्त संस्था आहेत. तेथे पालकमंत्र्यांच्या कार्यालयात माजी नगरसेवकांना बसायला सांगितले आहे. यातून तिथे राजकारण होत आहे. व्यवस्थेची मोडतोड करण्याचे काम होत आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com