EC Notice to Sharad Pawar Group: मोठी बातमी! शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस

Sharad Pawar News: मोठी बातमी! शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस
Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV
Published On

Election Commission Notice to Sharad Pawar Group: राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर अजित पवार यांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करत निवडणूक आयोगात धाव घेतली होती. यानंतर आता अजित पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नोटीस पाठवली आहे.

अजित पवार यांनी शिंदे सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर अजित पवारांसहित राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार यांनी 40 आमदारांच्या सही असलेलं पत्र निवडणूक आयोगाला दिलं.

Sharad Pawar
Pune Political News : पुण्याचे पालकमंत्री पाहुणे, कधीही कोल्हापूरला जातील; आमदार रवींद्र धंगेकरांची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका

या पत्रात 30 जूनला अजित पवार याची राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. या पत्राद्वारे अजित पवार यांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला आहे. (Latest Marathi News)

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार म्हणाले होते की, ते कायदेशीर लढाई न लढता थेट जनतेत जाऊन ही लढाई लढणार. मात्र आता निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नोटीस बजावल्याने त्यांना कायदेशीर लढाईत उतरावं लागणार आहे.

Sharad Pawar
Pradeep Kurulkar News: प्रदीप कुरुलकर प्रकरणी मोठी अपडेट, एटीएस करणार व्हाईस लेअर टेस्ट?

दरम्यान, शरद पवार गटाला पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये निवडणूक आयोगाने नेमकं काय म्हटलं आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच नोटीस मिळाल्यानंतर शरद पवार गटाकडून कोणते पावले चालले जातील हे देखील अद्याप समजू शकलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com