भाजप नेत्यांच्या हट्टामुळे कांजूरमार्ग कारशेडची अडवणूक; सचिन सावंत यांचा आरोप

भाजपाने महाराष्ट्र द्रोहाचे हीन राजकारण व बिल्डरच्या फायद्यासाठी अडवणूक सोडावी'' अस ट्विट काँग्रेस (Congress) नेते सचिन सावंत यांनी केले आहे.
Sachin Sawant
Sachin Sawant Saam Tv
Published On

मुंबई : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन आज मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकार आणि राज्यसरकार खडे बोल सुनावले आहेत. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद दोन्ही सरकारांनी सामंजस्यानं मिटवा. तुमचे राजकारण कोर्टात आणू नका, असे खडे बोल हायकोर्टाने सुनावले. यावर आता काँग्रेस (Congress) नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी प्रतिक्रीया दिली आहे. महाराष्ट्र भाजपा नेत्यांच्या हट्टामुळे मोदी सरकारने अडवणूक केली नसती तर कधीच कारशेडचा प्रश्न मार्गी लागला असता, असा टोला सावंत यांनी भाजप नेत्यांना लगावला.

''कांजूरमार्ग कारशेडवरील राजकारण न्यायालयात आणू नका असे उच्च न्यायालयाने सुनावले. महाराष्ट्र भाजपा नेत्यांच्या हट्टामुळे मोदी सरकारने अडवणूक केली नसती तर कधीच कारशेडचा प्रश्न मार्गी लागला असता. आतातरी भाजपाने महाराष्ट्र द्रोहाचे हीन राजकारण व बिल्डरच्या फायद्यासाठी अडवणूक सोडावी'' अस ट्विट काँग्रेस (Congress) नेते सचिन सावंत यांनी केले आहे.

Sachin Sawant
Sanjay Raut : संजय राऊतांच्या स्वागतासाठी एअरपोर्ट ते भांडुपपर्यंत मिरवणूक | SAAM TV

हायकोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला खडे बोल सुनावले

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन भाजप (BJP) आणि शिवसेनेतील (Shivsena) वाद चांगलाच रंगला आहे. या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अनेकवेळा भाजपवर आरोप केले आहेत. या प्रकरणावर आता मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर खडे बोल सुनानवले आहेत. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा वाद दोन्ही सरकारांनी सामंजस्यानं मिटवा. तुमचे राजकारण कोर्टात आणू नका, असे खडे बोल हायकोर्टाने सुनावले आहेत.

कांजूरमार्गच्या जागवर ज्या कुणाचा मालकी हक्क असेल, एमएमआरडीए त्याची किंमत मोजायला तयार आहे, केंद्र सरकारनं याचाही विचार करायला हवा, असंही हायकोर्टाने म्हटले आहे. जनहिताचा प्रकल्प मार्गी लागणं महत्त्वाचं आहे. सरकारनं जनतेसाठी काम करताना आपापसातले वाद विसरायला हवेत, अस खडे बोल हायकोर्टाचे राज्य आणि केंद्र सरकारला सुनावले आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com