BMC Election 2022: युती करावी की स्वबळावर लढावं? कॉंग्रेसमध्ये कन्फ्युजन...
रश्मी पुराणिक, मुंबई
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची स्थानिक स्वराज्य संस्था तथा सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे. या महापालिकेत शिवसेनेचं वर्चस्व आहे. सध्या मुंबई (Mumbai) महापालिकेत शिवसेनेसह (Shivsena) कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीही (NCP) सत्तेत आहे, तर महापौर हा शिवसेनेचा आहे. आता येत्या २०२२ त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत (BMC Election 2022) शिवसेना-राष्ट्रवादीसोबत आघाडी (Alliance) करावी की स्वबळावर लढावं असा प्रश्न कॉंग्रेस नेत्यांना पडला आहे. युती करावी की स्वबळावर लढावं याबाबत कॉंग्रेस नेत्यांमध्येच मतं-मतांतर आहेत. काहींचं म्हणणं आहे की, युती न केल्यास कॉंग्रेसचा पराभव होईल असं काही कॉंग्रेस नेत्यांना वाटतं, तर कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप हे स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे, त्यामुळे कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले आहेत. (congress confused about the alliance in bmc election 2022)
हे देखील पहा -
मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढल्यास पराभवाला सामोरं जावं लागेल असं काही नगरसेवकांचं मत आहे, तर काही नगरसेवक हे स्वबळावर लढण्याच्या भूमिकेचं समर्थन करताना दिसत आहे. याबाबत कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) म्हणाले की आघडीबाबत कॉंग्रेसच्या नगरसेवकांची मतं जाणून घेतली आहेत, आता वरिष्ठांना अहवाल सादर करणार असल्याचं भाई जगताप म्हणाले. एकीकडे काँग्रेस नगरसेवक हे शिवसेनेबरोबर आघाडी करा अशी मागणी करत आहेत पण, मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांची भूमिका स्वबळाची असल्याचं कळतयं.
2017 नुसार मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल:
एकुण प्रभाग संख्या: 227
बहुमतासाठी आवश्यक नगरसेवकांची संख्या: 114
शिवसेना नगरसेवकांची संख्या: 84
कॉंग्रेस नगरसेवकांची संख्या: 31
राष्ट्रवादी नगरसेवकांची संख्या: 9
भाजप नगरसेवकांची संख्या: 82
मनसे नगरसेवकांची संख्या: 7
एआयएमआयएम नगरसेवकांची संख्या: 2
समाजवादी नगरसेवकांच्या संख्या: 6
इतर नगरसेवकांची संख्या: 7
आतापर्यंतचा इतिहास पाहता शिवसेना मुंबई महापालिकेतला सर्वात मोठा पक्ष ठरतो, मात्र भाजपनेही २०१७ साली जोरदार मुसंडी मारत तब्बल ८२ नगरसेवक निवडून आणले. शिवसनेचे ८४ नगरसेवक होते, त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत सेनेला आघाडी करावी लागली होती. यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याता शिवसेनेचाही सुर आहे, आघाडी न झाल्यास याचा फायदा भाजपला होऊ शकतो.
दरम्यान आता मुंबईतील प्रभागांची संख्याही वाढवण्यात आली आहे. या मुद्द्यावरुनही राजकारण सुरु आहे. शिवसेनेने आपल्या सोयीनुसार प्रभागांची संख्या वाढवली असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. २०१७ साली मुंबईत २२७ प्रभाग होते, तर यंदा ९ प्रभाग वाढवण्यात आले असून प्रभागांची संख्या आता २३६ इतकी झाली आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.