1993 Mumbai Blast: स्फोटकं पुरवणारा दाऊदचा हस्तक 'अबू बकर'ला यूएईतून अटक; भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु

1993 Mumbai Blast Latest News: एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले की, 2019 मध्येही तो यूएईमधून पकडला गेला होता आणि त्यानंतर तांत्रिक कारणांमुळे त्याला भारतात आणणे सोपे नव्हते. यावेळी तो पुन्हा पकडला गेला असून यावेळी त्याला भारतात आणण्याचा प्रयत्न भारत करणार आहे.
1993 Mumbai Blast Latest News: Abu Bakar Arrested IN UAE
1993 Mumbai Blast Latest News: Abu Bakar Arrested IN UAESaam TV

मुंबई: 1993 बाॅम्ब स्फोटातील (1993 blast mumbai) आरोपी अबू बकरला (Abu Bakar) UAE मधून पून्हा पकडलं (Arrested) असल्याचा दावा एजन्सीने केला आहे. त्याला पून्हा भारतात आणण्याची कायदेशीरप्रकियाही सुरू असल्याचे सांगितले जाते आहे. अबु बकरला 2019 मध्ये भारतात आणण्याचे प्रयत्न तपास यंत्रणांनी केले होते, मात्र तांत्रिक गोष्टींमुळे आणता आलं नाही. अबु बकरवर स्फोटासाठी RDX पुरवल्याचा आरोप होता. तसेच बाॅम्ब (Bomb) बनवण्याच्या ट्रेनिंगही वेळीही तो उपस्थित होता. CBI ने दुसऱ्या एजन्सीच्या मदतीने त्याला अटक केली आहे. (1993 Mumbai Blast Accused Abu Bakar Held in UAE, Terrorist To be Extradited to India Soon: Report)

हे देखील पहा -

1993 Mumbai Blast Latest News: Abu Bakar Arrested IN UAE
महापालिका विरोधी पक्षनेत्याच्या अर्वाच्च भाषेचा व्हिडिओ व्हायरल; प्रभाग रचनेचा घेतला होता आक्षेप

एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले की, 2019 मध्येही तो यूएईमधून पकडला गेला होता आणि त्यानंतर तांत्रिक कारणांमुळे त्याला भारतात आणणे सोपे नव्हते. यावेळी तो पुन्हा पकडला गेला असून यावेळी त्याला भारतात आणण्याचा प्रयत्न भारत करणार आहे. अबूवर भारतात स्फोट घडवण्यासाठी आरडीएक्स आणल्याचा आरोप आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू बकर याला UAE मधून अटक केल्याचा दावा एजन्सींनी केला आहे. त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही सूत्रांनी सांगितले. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) जवळचा हस्तक म्हणूनही अबु बकरची ओळख आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com