Sonia Gandhi
Sonia Gandhisaam tv

Congress MLAs: काँग्रेसच्या नाराज आमदारांचं सोनिया गांधींना पत्र, भेटीसाठी मागितली वेळ

काँग्रेसचे आमदारही नाराज असल्याने थेट पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींची वेळ मागितल्याचं स्पष्ट होतंय.
Published on

पुणे: काँग्रेसच्या 25 आमदारांनी अखिल भारतीय काँग्रेस (Congress) कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. आमदारांनी सोनिया गांधींकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. मात्र, नाराज नाही फक्त भेटीसाठी पत्र दिले आहे, असं काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी स्पष्ट केलं (Congress 25 MLAs write to Sonia Gandhi and asked for time to meet).

Sonia Gandhi
Nana Patole: राहुल गांधींकडे व्हिजन, 2024 मध्ये ते पंतप्रधान होतील - नाना पटोले

सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. इकडे शिवसेना (Shivsena) राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चा आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसचे (Congress) आमदारही नाराज असल्याने थेट पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींची (Sonia Gandhi) वेळ मागितल्याचं स्पष्ट होतंय.

काँग्रेसच्या 25 नाराज आमदारांनी सोनिया गांधीना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली आहे. यात आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte), प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि कुणाल पाटील (Kunal Patil) यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. महामंडळावरील नियुक्त्यांवरुन खदखद आणि विविध मुद्यांवर नाराजी असल्याचं कळतंय. मात्र, काही मागण्यांसाठी आम्ही भेटतोय. नाराज वगैरे असे काही नाही, असे मत संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com