मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेत राडा; महिला आमदारासोबत नगरसेविका भिडली

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेत भाजपमध्ये राडा झाला.
Mira Bhayandar Municipal corporation
Mira Bhayandar Municipal corporationsaam tv
Published On

मुंबई : मिरा-भाईंदर महानगरपालिकेची (Mira-Bhayandar Municipal corporation) सर्वसाधारण महासभा सुरु असतानाच चक्क दोन भाजप नगरसेविका आपापसात भिडल्याची घटना घडली आहे. नगरसेविका एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यामुळे महासभेत एकच खळबळ उडाली. आज मंगळवारी दुपारी 2.30 वाजता मिरा-भाईंदर महानगरपालिकेची सर्व साधारण महासभा (General assembly) आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजप नगरसेविका हेतल परमार आणि नगरसेविका तथा आमदार गीता जैन (Geeta jain) यांच्यात वादाची ठिणगी पेटल्याने महासभेतील वातावरण तापलं होतं. मात्र, सभागृहा उपस्थित असणाऱ्या सदस्यांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

Mira Bhayandar Municipal corporation
....तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी मिरा-भाईंदर महानगरपालिकेची सर्व साधारण महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मिरा रोड येथे आरक्षण क्रमांक २६१ या जागेवर उद्यान आरक्षण असतानाही बारची निर्मिती होत असल्याचा विषय भाजप नगरसेविका निला सोन्स यांनी 'ज'चा प्रस्ताव ठेवून उपस्थितीत केला.मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे सभा यावर निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे हा प्रश्न पुढील महासभेत घेण्याचे आदेश आपण देत असल्याचे पिठासीन अधिकारी उपमहापौर हसमुख गेहलोत यांनी सांगितले.

त्यानंतर भाजप नगरसेविका तथा आमदार गीता जैन पुढील विषय मांडण्याकरीता उभ्या राहिल्या. त्याचदरम्यान भाजप नगरसेविका हेतल परमार यांनी काही भाष्य केले. त्यावर गीता जैन यांनी देखील परमार यांना 'अपने औकात में रेह'असे प्रतिउत्तर दिले. यामुळे हेतल परमार या चवताळून थेट गीता जैन यांना मारण्याकरिता त्यांच्या अंगावर धावून गेल्या.मात्र यावेळी उपस्थितीत सभागृह सदस्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी मध्यस्ती केल्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.मात्र या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे दोन्ही नगरसेविकेच्या कृत्याचा निषेध करण्यात येत आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com