मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी काल सोमवारी पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी जे डब्लू मॅरियट हॉटेलच्या बाहेर (NCP Strike) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सिलिंडर गॅसदरवाढीवरुन इराणींना काळे झेंडे दाखवत आंदोलन केले. 'महागाईची राणी,स्मृती इराणी, अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादीने इराणी यांचा निषेध केला. त्यानंतर राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर विधान सभेचे विरोधी पक्षनेते (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास (Maharashtra Government) आघाडी सरकारला इशारा दिला आहे. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. त्यामुळे पहिल्यांदा तक्रार करू,मात्र कारवाई झाली नाही, तर आम्हीही तुम्हाला सोडणार नाही, असा सणसणीत इशारा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसला धारेवर धरलं आहे.
पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या दौऱ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनाबात देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, पोलिसांच्या संरक्षणात भाजपच्या नेत्यांवर हल्ले करणे,पोलिस संरक्षणात आमच्या नेत्यांच्या सभांमध्ये आंदोलन करणं,आमच्या नेत्यांवर अंडे टमाटर फेकण्याचा प्रयत्न करणं, हे सर्व स्पष्टपणे लक्षात येत आहे.हे सर्व आपला राज्य आहे,आपले गृहमंत्री आहे या तोऱ्यामध्ये होतंय.आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत.त्यामुळे पहिल्यांदा तक्रार करू, मात्र कारवाई झाली नाही,तर आम्हीही सोडणार नाही.
हे देखील पाहा
तसंच फडणवीस खासदार सुप्रिया सुळेंबाबत बोलताना म्हणाले, सुप्रियाताईंनी सर्वच बाबतीत अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे. यापूर्वी नवनीत राणांसोबत जे काही झालं,तेव्हा सुप्रियाताई काहीच बोलल्या नाही.यापूर्वीही महिलांवर जेव्हा जेव्हा हल्ले झाले, तेव्हा सुप्रियाताई काहीच बोलल्या नाही.आमच्या पक्षातील काही महिला नेत्यांना जेव्हा पोलिसांनी वाईट वागणूक दिली तेव्हाही त्या काही बोलल्या नाही. त्यामुळे सुप्रियाताईंनी महिलांच्या संदर्भात अशी भूमिका वारंवार घेतली तर आम्ही त्यांचे स्वागत करू. छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबतही फडणवीसांनी वक्तव्य केलं. शिवसेना एक स्वतंत्र पक्ष आहे, ते ठरवतील त्यांना काय करायचं आहे, छत्रपती संभाजी राजे स्वतः सक्षम आहे,त्यांच्या निर्णय ते स्वतः घेतील त्यामुळे या संदर्भात मी काही बोलण्याचा कारण नाही.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.