संभोगादरम्यान पार्टनरच्या संमतीशिवाय Condom काढणं हा गुन्हा; Canada च्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

canada supreme court news | महिलेचा आरोप आहे की, तिने तिच्या पार्टनरला सेक्स करताना कंडोम वापरण्यास सांगितले होते, मात्र त्याने कंडोमशिवाय तिच्यासोबत संबंध ठेवले होते.
canada condom news
canada condom newspexels
Published On

मुंबई: सेक्स करताना आपल्या पार्टनरच्या संमतीविना कंडोम (Condom) काढणे हा गुन्हा मानला जाईल, असा निकाल कॅनडाच्या (Canada) सुप्रीम कोर्टाने दिला आहे. वास्तविक, न्यायालयाने असा निर्णय २०१७ च्या एका प्रकरणात दिला आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, २०१७ मध्ये, एक महिला आणि तिचा पार्टनर ऑनलाइन चॅटींगच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आले. यानंतर संभोग करण्याचे दोघांनी ठरवले. महिलेचा आरोप आहे की, तिने तिच्या पार्टनरला सेक्स करताना कंडोम वापरण्यास सांगितले होते, मात्र त्याने कंडोमशिवाय तिच्यासोबत संबंध ठेवले होते. या महिलेचे म्हणणे आहे की, संबंध बनवताना आपल्याला याची माहिती नव्हती. पुढे त्या महिलेला एचआयव्हीची लागण झाली. या अहवालात महिलेच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. (Condom News Canada Supreme Court)

हे देखील पाहा -

आरोपीचा युक्तीवाद कोर्टानं फेटाळला

या प्रकरणी महिलेचा पार्टनर रॉस मॅकेंझी किर्कपॅट्रिकवर लैंगिक छळाचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचवेळी रॉसने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. सुनावणीदरम्यान रॉसने सांगितले की, त्याच्या महिला जोडीदाराने कंडोम घातला नसतानाही सेक्सला परवानगी दिली होती, परंतु कनिष्ठ न्यायालयाने रॉसचा युक्तिवाद फेटाळला. ब्रिटीश कोलंबिया न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करून पुन्हा खटला चालवण्याचे आदेश दिले. त्यानंतर रॉस यांनी ब्रिटिश कोलंबिया न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. हे प्रकरण नोव्हेंबरमध्ये सुनावणीसाठी आले होते. (Removing Condom Without Partner's Consent Is Sex Crime)

canada condom news
Alia Bhatt: आलिया भट्टचा धमाकेदार फोटोशूट, सिंपल लूक पाहून चाहते घायाळ!

न्यायालयाने काय म्हटले?

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, न्यायालयाने या प्रकरणी ५-४ मतांनी निर्णय देताना सांगितले की, "कंडोमशिवाय संबंध ठेवणे आणि कंडोमसोबत संबंध ठेवणे यात मूलभूत आणि गुणात्मक फरक आहे." कोर्टाने म्हटले आहे की, 'जोपर्यंत कंडोमचा वापर जोडीदाराने स्पष्टपणे मान्य केला नाही तोपर्यंत तो अचानक वापरता येणार नाही.' कंडोम काढणे हा लैंगिक अपराध मानला जाईल. त्याचवेळी, या अहवालात ब्रिटन आणि स्वित्झर्लंडच्या न्यायालयांनीही सेक्स करताना पार्टनरच्या संमतीशिवाय कंडोम काढल्यास हे कृत्य गुन्ह्याच्या श्रेणीत येईल असं म्हटलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com