नाट्य-चित्रपट क्षेत्राच्या गतवैभवासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गोरेगावच्या चित्रनगरीमध्ये चांगले रस्ते, पायाभूत सुविधा, प्रवासी वाहतुक व्यवस्था, सुरक्षा आणि स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले
Cm Eknath Shinde
Cm Eknath Shinde Saam Tv
Published On

'आपली संस्कृती, कला जोपासलीच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी नाट्य, चित्रपट आणि कला क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,' अशी ग्वाहीच खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील दिग्गजांशी मुख्यमंत्र्यांनी 'मला तुमचं ऐकायचंय...! आपण एकमेकांबद्दल बोलत असतो. आता एकमेकांशी बोलुया.., असं म्हणत एका विशेष भेटीत दिलखुलास संवाद साधला. यावेळी मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Cm Eknath Shinde
Video | महिलांच्या शौचालयात डोकावून पाहणाऱ्याला अटक; IIT Bombay मधील धक्कादायक प्रकार

गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीतील चांगले रस्ते, पायाभूत सुविधा, प्रवासी वाहतुक व्यवस्था, सुरक्षा आणि स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहेत. चित्रपटांना जीएसटी मु्क्त, ज्येष्ठ कलाकारांसाठी मानधन योजना, त्यांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा, ज्येष्ठ कलाकार, वादक, तंत्रज्ञ आदींना विमा संरक्षणाबाबत तसेच अनेक धोरणात्मक बाबींविषयी मंत्रालयात बैठक आयोजित करून संबंधित विभागांच्या समन्वयाने चर्चा करत निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी अश्वासन दिले. तसेच चित्रनगरीची पाहणी केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

Cm Eknath Shinde
Dasara Melava | शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आम्हीच करणार; ठाकरे गट लागला कामाला

मुख्यमंत्री म्हणाले, कला क्षेत्राकडे पाहताना आपल्याला कायम त्यातील झगमगाट दिसतो. मात्र कलाकारांच्या व्यथा त्यांचे प्रश्न कळत नाहीत. ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब या दोघांनाही कला, संस्कृती आणि मराठी कला क्षेत्राविषयी जिव्हाळा होता. या क्षेत्रातील पडद्यामागील कलावंत, तंत्रज्ज्ञ यांच्याशी निगडीत असे अनेक विषय आहेत. त्यांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यापासून विमा संरक्षण अशा सर्वच बाबतीत सकारात्मक निर्णय घेतले जातील.

Cm Eknath Shinde
पत्रा चाळ प्रकरणात शिवसेनेसह राष्ट्रवादीचाही समावेश, भाजप नेत्याचे शरद पवारांवर गंभीर आरोप

सोबतच मुख्यमंत्री पुढे बोलतात, नाट्यगृहांची परिस्थिती सुधारणे, चित्रपटगृहांच्या समस्या तसेच चित्रपटांसाठी कर सवलत तसेच अन्य मुद्यांवरही विचार विनिमय, चर्चेने उपाययोजना केल्या जातील. संस्कृती, कला जोपासली गेली पाहिजे. या गोष्टींचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जातील. समाजासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत. यातूनच उत्तम कलावंत घडतील, ते देश आणि आपल्या राज्याचा नावलौकिक वाढवतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्या नाट्य, चित्रपट सृष्टीला गतवैभव पुन्हा मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

Cm Eknath Shinde
शिवसेना दसरा मेळावा शीवतीर्थावरच, तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री?, बॅनरची होतेय चर्चा

यावेळी निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर प्रशांत दामले, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, वर्षा उसगांवकर, विद्याधर पाठारे, मंगेश कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, जितेंद्र जोशी, गायक अवधूत गुप्ते, विजय पाटकर, विजय केंकरे, प्रसाद ओक, चंद्रकांत कुलकर्णी यांनी आप आपल्या समस्या व मुद्यांची मांडणी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com