उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर CM एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुलाखतीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Eknath shinde and uddhav thackeray
Eknath shinde and uddhav thackeray saam tv

मुंबई : जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठं पक्षसंकट उभ ठाकलं आहे. शिवसेनेतील या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर मुलाखत दिली आहे. ही मुलाखत दै. सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Shinde News )

Eknath shinde and uddhav thackeray
'पक्षात १ डझन आमदार आणि...'; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर नारायण राणे यांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पालापाचोळ्यानं इतिहास घडवला आहे. हे जनतेला माहित आहे. इतिहास घडवणारे कोण असतात, हे जनतेने पाहिले आहे. आमची लढाई सत्तेसाठी नाही. आमची लढाई बाळासाहेबांच्या विचारांसाठी होती. बाळासाहेबांच्या विचारांच्या भूमिकेतून आम्ही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना पालापाचोळा, पानगळ काय म्हणायचा हा त्यांचा अधिकार आहे . परंतु पुन्हा एकदा सांगतो की, याच पालापाचोळ्याने इतिहास घडवला आहे'.

Eknath shinde and uddhav thackeray
मुंबईची ओळख पुसण्याचा भाजपचा प्रयत्न; मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे म्हणाले ?

उद्धव ठाकरे म्हणाले होते की,'वादळ म्हटल्यानंतर पालापाचोळा उडतोच. तो पालापाचोळा उडतोय सध्या आणि पालापाचोळा एकदा खाली बसला की खरं दृश्य लोकांसमोर येईल. सडलेली पानं ही झडणारच आणि ती झडलीच पाहिजेत. पानगळ झाली की झाड उघडं बोडकं दिसायला लागतं. पण काहीच दिवसांत झाडाला पुन्हा नवी पालवी फुटते. आपल्या झाडालाही नवे अंकुर फुटतील कारण शिवसेना आणि युवक हे नातं सेनेच्या जन्मापासून आहे. पालापाचोळा म्हणजे ठाणेकर नाहीत'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com