Shambhuraj Desai : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी ४ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पाटण येथील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित गावांच्या पुनर्वसनाबाबत मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात आयोजिलेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटणवासियांना सर्वताेपरी सहकार्य करु असे आश्वासित केले. (CM Eknath Shinde Marathi News)
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या आंबेघर खालचे अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुबळी, शिदुकवाडी, जितकरवाडी (निती) या ७ गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने खाजगी जमिन खरेदी करण्याकरीता तातडीने कार्यवाही करण्यात यावी. या गावामध्ये ५५० घरे नव्याने उभारण्याच्या कामाला गती देण्यात यावी. या गावांचा कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व समन्वयन यंत्रणांनी गतीने काम करावे अशी सूचना देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत उपस्थित अधिका-यांना केली.
मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात पाटण विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित गावांच्या पुनर्वसनाबाबत आयोजिलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बोलत होते. या बैठकीस आमदार शंभूराज देसाई, अपर मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधानसचिव असिम कुमार गुप्ता, वित्त विभागाच्या सचिव श्रीमती ए. शैला, साता-याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.